सॅन मारिनो जगातलं इटुकलं राज्य! या छोट्या राज्याच्या मोठ्या गोष्टी!

Image: dailymail

आपल्या जगाच्या पोटात लहान-मोठे असे अनेक देश आहेत. प्रत्येक देशाचं, राज्याचं, शहराचं, गावाचं काही ना काही वैशिष्ट्यं आहेच. आता तुम्हाला 'सॅन मारिनो' चं वैशिष्ट्यं विचारलं तर सांगता येईल का? तुम्ही म्हणाल मुळात सॅन मारिनो काय आहे, कुठे आहे, ते शहर आहे की देश की एखादं गावं हेच माहित नसेल तर त्याचं वैशिष्ट्यं कसं बरं सांगायचं? असं वाटलं तरी सॅन मारिनोबद्दल आवर्जून समजून घ्यावं अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. सॅन मारिनो म्हणजे इटली देशातलं एक सर्वात छोटं राज्य. पण छोटं जरी असलं तरी या राज्यात अनेक रहस्यं दडलेली आहेत. अशी रहस्यं जी आपल्याला या छोट्याशा राज्याच्या प्रेमात पाडतात.

हेही वाचा!

छोटंसं राज्य पण जगप्रसिध्द कसं?

सॅन मारिनो या राज्यातलं प्रजासत्ताक जगातलं सर्वात जुनं आणि जिवंत असलेलं प्रजासत्ताक आहे. सॅन मारिनो येथील प्रजासत्ताक इ.स. ३०१ मध्ये अस्तित्त्वात आलं. प्रजेचं राज्यं असलेलं स्वतंत्र राज्य म्हणून सॅन मारिनो या राज्याला १७०० वर्षांचा इतिहास आहे.

छोटे देश, छोटी राज्यं म्हणजे त्यांच्याकडे पैसे कमी, कर्ज जास्त अशी अवस्था जगभरात पाहायला मिळते. आज जगात बहुतांश देशांच्या डोक्यावर थोडं किंवा जास्त इतर देशांचं कर्ज असतं. पण सॅन मारिनो राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक व्यवस्थापन इतकं काटेकोर आणि अचूक आहे की या राज्यावर कोणाचं एक रुपयाचंही कर्ज नाही. डोक्यावर कर्ज नसलेलं जगातलं एकमेव राज्य म्हणूनही सॅन मारिनो राज्याला ओळखलं जातं.

सॅन मारिनो राज्य हे फुटबाॅलवर प्रेम करणारं राज्य म्हणूनही ओळखलं जातं. या राज्याची लोकसंख्या केवळ ३३,००० हजार असली तरी या राज्याची 'टायटन्स ऑफ सॅन मारिनो' नावाची फुटबाॅल टीम आहे. या टीमने नावारुपाला येण्यासाठी अनेक अवघड आव्हानांचा सामना केलेला आहे. त्याचमुळे सॅब मारिनो येथील प्रत्येक नागरिकाच्या ह्दयात 'टायटन्स ऑफ सॅन मारिनो 'ला विशेष आणि जिव्हाळ्याचं स्थान आहे.

Image: factcity

सॅन मारिनो राज्य  'लॅण्डलाॅक्ड' भूप्रदेश म्हणून ओळखला जातो. जगात असे फार कमी देश आणि राज्य आहेत जिथे विमानतळंच नाहीये. पण म्हणून येथील नागरिकांची गैरसोय होत नाही. सॅन मारिनो हे इटलीच्या फारच जवळ आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करायचा झाल्यास किंवा विमानातून उतररुन पूढे सॅन मारिनोला येण्यासाठी रस्स्त्याने इटली गाठावं लागतं. पण या छोट्याशा सॅन मारिनोचं सौंदर्य इतकं अद्वीतीय आहे की सॅन मारिनोकडून इटलीला जाताना किंवा इटलीवरुन सॅन मारिनोकडे गाडीने प्रवास करताना बाहेरचे देखावे इतके मोहक असतात की गाडीत बसलेली व्यक्ती आपलं भान हरपून बसते. त्यामुळे आपल्या राज्यात विमानतळ नाही याबाबत सॅन मारिनो येथील एकाही नागरिकाची तक्रार नाही.

सॅन मारिनो  म्हणजे जगातलं सर्वात छोटं राज्य आहे. किती छोटं तर ६१ चौरस किलोमीटर असलेलं राज्य आहे. जागत आज जे मोठे मोठे शाॅपिंग्ज माॅल आहेत तशा एखाद्या मोठ्या शाॅपिंग माॅलसारखं सॅन मारिनोचं आकारमान आहे. छोटं. सुंदर, शांत असं राज्य म्हणजे सॅन मारिनो हीच या राज्याची प्रमुख ओळख आहे.

सॅन मारिनो या राज्यात एकही मॅकडोनाल्ड रेस्टोरण्ट नाही. उलट या राज्यात तेथील स्थानिक जे पदार्थ आवडीने खाल्ले जातात, त्या विशिष्ट पदार्थांचा आस्वाद देणारी छोटी छोटी हाॅटेल्स या देशात आहे.

सॅन मारिनोचं नागरिक झाल्यास त्या देशात असलेल्या एकमेव कसिनोमध्ये खेळायला जाण्याची परवानगी नाही. उलट या राज्यात असलेल्या ऐतिहासिक जागा, संग्रहालय पाहून या राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अशा जागांना गेल्यास मोफत प्रवेश मिळतो.

हेही वाचा!

Image: expedia

सॅन मारिनो येथील सर्वात प्राचीन खेळ हा 'पॅलिओ डेल्ले बालेस्टर' या नावाने ओळखला जातो. दगड फेकणं असं या खेळाचं स्वरुप आहे. या खेळात जास्तीत जास्त वजनाचे दगड घेवून ते जास्तीत जास्त दूर फेकायचे असतात. दगड फेकण्याचा हा खेळ प्राचीन असला तरी दरवर्षी या खेळासाठी स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित केली जाते.

मुळातंच सॅन मारिनो हे छोटंसं राज्य. शांत, सुंदर ही या राज्याची वैशिष्ट्यंही आहेत. या राज्यात रस्त्यांवर गर्दी नाही. आपली गाडी दामटून पुढे जाण्याची कोणालाच घाई नाही.  त्यामुळे रस्त्यावर वाहनं, पादचारी हे अतिशय सावकाश चालतात. म्हणूनच सॅन मारिनो  राज्यात सिग्नला फक्त एक लाइट लावलेला आहे.

सॅन मारिनो या राज्याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या गाड्यांवर कशा नंबरप्लेट असतात तशा राज्य, रजिस्ट्रेशन यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नसतात. तर गाड्यांना जी मागे नंबरप्लेट लागते त्यावर सॅन मारिनोचं राज्य चिन्हं आणि झेंडा काढलेला असतो. गाड्यांवर अशी नंबर प्लेट आपण कधी पाहिली तरी आहे का?

मग कसं वाटलं हे जगातलं इटुकलं राज्य?  

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact