जंगलातल्या गोष्टी जर आपल्याला कोणी सांगू लागलं तर आपले कान लगेच टवकारतात. जंगलातली प्रत्येक गोष्टच आपल्याला अद्भूत आणि आश्चर्यकारक वाटते. जगभरात अनेक मोठी जंगलं आहेत. त्या जंगलांपैकी ॲमेझाॅनचं जंगल म्हणजे पृथ्वीवरचं मोठं आश्चर्य आहे. हे आश्चर्य निर्माण केलंय ते निसर्गानं. ॲमेझाॅन जंगलातली प्रत्येक गोष्टच जगासाठी अद्भूत आहे. पृथ्वी सजीवांना जगण्यायोग्य ठेवण्यात ॲमेझाॅन जंगलाची भूमिका महत्वाची आहे. त्याचं कारण या जंगलात दडलेला खजिना.
ॲमेझाॅन हे जगातलं सर्वात मोठं उष्णकटिबंधिय पर्जन्यवन म्हणून ओळखलं जातं. या जंगलातून पृथ्वीला २० टक्के ऑक्सिजन पुरवला जातो. या जंगलातील झाडं हवा शुध्द करण्याचं मोठं काम करतात. म्हणून ॲमेझाॅन जंगलाला पृथ्वीचं फुप्फुस असं म्हटलं जातं. ॲमेझाॅनचं जंगल इतकं मोठं आहे की यात इंग्लड, आर्यलंड सारखे देश १७ वेळा बसू शकतील. ॲमेझाॅनचं जंगल दक्षिण अमेरिकेत ५५ लाख चौरस र किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं आहे. या जंगलाने ९ देश व्यापले आहेत.

Image: .pexels
हेही वाचा!
ॲमेझाॅन जंगलातली जैवविविधता
जैवविविधतेच्या दृष्टीनं ॲमेझाॅन जंगल समृध्द आहे. ॲमेझाॅनच्या जंगलात ४०,००० वनस्पतींच्या प्रजाती आहेत. १,३०० पक्ष्यांच्या प्रजाती, माशांचे २,२०० प्रकार, सस्तन प्राण्यांचे ४२७ प्रकार, उभयचर प्राण्यांच्या ४३० प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३८० प्रजाती आहेत. तर किटकांचे २५ लाख प्रकार आहेत. जगभरातल्या एकूण जैवविविधतेपैकी १० टक्के जैवविविधता ॲमेझाॅनच्या जंगलात आहे. जगभरात जे अन्न खाल्लं जातं त्यापैकी ८० टक्के अन्नाचं मूळ ॲमेझाॅनच्या जंगलात आहे. या जंगलात खाता येणाऱ्या फळांचे ३००० प्रकार आहेत. त्यात संत्री, लिंबू, अव्हॅकॅडोज, नारळ, द्राक्षं, आंबे, अननस यासारख्या माहितीतल्या फळांचा समावेश आहे.
ॲमेझाॅन हे जगातलं सर्वात मोठं उष्णकटिबंधिय पर्जन्यवन म्हणून ओळखलं जातं. या जंगलातून पृथ्वीला २० टक्के ऑक्सिजन पुरवला जातो. या जंगलातील झाडं हवा शुध्द करण्याचं मोठं काम करतात. म्हणून ॲमेझाॅन जंगलाला पृथ्वीचं फुप्फुस असं म्हटलं जातं. ॲमेझाॅनचं जंगल इतकं मोठं आहे की यात इंग्लड, आर्यलंड सारखे देश १७ वेळा बसू शकतील. ॲमेझाॅनचं जंगल दक्षिण अमेरिकेत ५५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं आहे. या जंगलाने ९ देश व्यापले आहेत.

Image: .pexels
ॲमेझाॅन अमेझिंग का?

Image: pexels
पण आता मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात असल्याने ॲमेझाॅनच्या जंगलातून वनस्पती, प्राणी, किटकांच्या १३७ प्रजाती रोज नष्ट होत आहेत. ॲमेझाॅन जंगल त्याच्या मूळ आकारापेक्षा २० टक्के लहान झालं आहे. २००५ ते २०१० या कालखंडात ॲमेझाॅन जंगलाला तीव्र दुष्काळांचा सामना करावा लागला. तसेच जंगलात वणवे लागण्यचं प्रमाणही वाढलं आहे. जागतिक तापमानाचा परिणाम ॲमेझाॅनवरही व्हायला लागला आहे. तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मते जागतिक तापमान ३ डिग्रीने वाढलं तर ७५ टक्के ॲमेझाॅन जंगल नष्ट होवू शकतं. सध्या जंगलावर जागतिक तापमानाचा परिणाम स्पष्ट स्वरुपात दिसत नसला तरी तज्ज्ञ म्हणतात की, ॲमेझाॅन जंगलावर जागतिक तापमान वाढीचे दृश्य परिणाम जाणवू लागण्याची ती वेळही फार दूर नाही.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact