सुपर बग्ज चावून आपण आजारी पडलो तर! सुपरबग्ज असतात कसे?

Image: healthdirect

'आमच्या वेळेस तर असे काही आजार नव्हतेच. हे नवीनच काहीतरी आहे!' अशा प्रकारची वाक्यं तुम्ही घरात अनेकदा ऐकली असतील ना.. आपले आजी आजोबा बऱ्याचदा असं काही बोलत असतात. आजी आजोबांंच्या त्यांच्या तरुणपणातील अनेक गोष्टी आता हरवून गेल्या आहेत. पूर्वीचं गाव, पूर्वीच्या नद्या, पूर्वीचं वातावरण, हवामान असं काहीच आता राहिलेलं नाही असं आजी आजोबांचं म्हणणं असतं. या सगळ्यांसोबतच आजारपणात, उपचारातही खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. भौतिक स्वरुपाच्या गोष्टींमध्ये झालेला बदल हा आधुनिकतेमुळे आहे. जागतिकीकरणाचे परिणाम आपल्या जगण्यावरही झालेले आहेत. पण आजी आजोबांच्या काळातलं वातावरण, आजारपणं बदललीत हे कशानं झालं असेल? असा प्रश्न पडला ना तुम्हाला.. तर याच्ं उत्तर आहे हवामान बदल. क्लायमेट चेंज.

हवामान बदल आणि आजारपण असा अभ्यास नासाने (नॅशनल एरोनाॅटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) केला असता हवामान बदलामुळे आजारपणाच्या बाबतीत आता आहे त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे असं अभ्यासक आणि शास्त्रज्ञ म्हणतात. हवामान बदलाचा परिणाम म्हणून माणसासाठी पृथ्वीवरचे धोके वाढलेले आहेत आणि अजून वाढणार आहेत. माणसाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या घटना पृथ्वीवर घडू लागल्या आहेत्. निसर्गात टोकाचे बदल होत आहेत. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो आहे. थेट आरोग्यावर परिणाम करतील असे बदल निसर्गात, आजूबाजूच्या वातावरणात होत आहेत.

हेही वाचा!

हवामान बदलामुळे आजारपणाचा धोका

हवामान बदलाचा मानवाच्या आरोग्यावर किती आणि कोणता परिणाम होतो, याचा अभ्यास केला असता मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे अनेक आजार समोर आले आहेत.

लिम डिसीजचे रुग्ण वाढत आहे. अमेरिका आणि जगातल्या इतर भागांमध्ये लिम डिसीजचे रुग्ण वाढत आहेत. बोरिलिया बर्डडाॅफरी नामक जिवाणूमुळे हा आजार होतो. किडा चावल्याने हा आजार होतो. अंटार्क्टिका खंड सोडला तर अमेरिका आणि जगात इतर लाइम डिसीजचे रुग्ण आढळू लागले आहेत. हा आजार प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात दिसून येतोय. डोकं दुखणं, ताप येणं, थकवा आणि त्वचेवर पुरळ येणं हे त्रास या आजारपणात अनुभवण्यास येतात. एक किडा चावल्याने आयुष्य धोक्यात येतं. यावर डाॅक्टरांकडे जावून काही इलाजच नाही केला तर हदयावर वाईट परिणाम होवून मृत्यूदेखील ओढावतो. अमेरिकेत ' द युएस सेन्टर्स ऑफ डिसीज कण्ट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार लिम डिसीजचे दर वर्षी ३०,००० रुग्ण वाढतात. आता तर लिम डिसीजचा विस्तार कॅनेडातही झाला आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे हे किडे वाढतही आहेत आणि इतरत्र पसरतही आहेत. त्यामुळे किडे चावून लिम डिसीज होण्याचा धोका या हवामान बदलाच्या काळात वाढला आहे

Image: livescience

Image: science.time

हवामान बदलामुळे डासांची पैदास कशी वाढली त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. हवामान बदलामुळे जगात दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिथे दुष्काळ पडला आहे तिथलं वातावरण गरम असतं. आणि असं वातावरण डासांसाठी अनुकूल असतं. डास या वातावरणात अंडी घालतात. तसेच डास जास्त लवकर अंडी घालू लागले आहेत. त्यांचा अंडी घालण्याच कालावधी वाढला आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू,, झिका, चिकूनगुण्या सारखे गंभीर आजार होत आहे. जगभरात डासांमुळे संसर्ग होवून आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे.

हेही वाचा!

युएस सेंटर्स फाॅर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार २ कोटी ४० लाख अमेरिकन लोकं तापाने हैराण आहेत तर १ कोटी लोक दम्याने त्रासले आहेत. हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम झाडांवर होतो आहे. पुर्ननिर्माणासाठी झाडं परागकण हवेत पसरवतात. हवेतल्या या परागकणांचा अनेकांना त्रास होतो. हवेतले हे परागकण डोळे, कान, नाक आणि घशात जातात. त्यामुळे घसा खवखवतो. खूप शिंका येतात. दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. शिवाय दिवसभराचा उष्मा वाढलेला आहे. उष्म्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणामही झाडांवर होवून झाड जास्त परागकण हवेत पसरवत आहेत. अभ्यासक म्हणतात २०४० पर्यंत हवामान बदलामुळे झाडं हवेत जे परागकण सोडत आहे त्याचं प्रमाण दुप्पट होईल.

वाढत् चाललेल्या  उष्म्याचा परिणाम आर्टिक खंडावरील मातीवर होतो आहे. येथील माती गोठलेल्या स्वरुपात आहे. पण हवामान बदलामुळे ही माती वितळत आहे. या मातीत अनेक सूक्ष्म जीव, विषाणू गोठलेल्या स्वरुपात होते. पण ते आता वितळत आहे. त्यामुळे या मातीतले गोठलेले सूक्षजीवही मोकळे होत असून त्यामुळे भविष्यात प्राचीन काळातले मातीत असलेले जिवाणू, विषाणू मोकळे होतील आणि भयानक आजार पसरवतील. यामुळे पर्यावरणचक्र बिघडण्याचा , वन्यजीव मारले जाण्याचा, माणसांच्या मृत्यूचा धोका वाढणार आहे.

Image: news.climate

हवामान बदल ही छोटी गोष्ट नसून गंभीर बाब आहे. त्याकडे सर्वांनीच लक्ष पुरवणे आवश्यक आहे. हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सगळ्यांनीच उपाययोजना केल्या तर भविष्यात पृथ्वीवरील पर्यावरण आणि जीवन टिकून राहील असं शास्त्रज्ञ सांगत आहेत. आपण माणसं शास्त्रज्ञांचं म्हणणं गांभिर्यानं घेणार आहोत की नाही?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact