मित्राला मदत करण्यासाठी सरबताची गाडी. एवढुशा मुलाला एवढी समज?

Image: timeforkids

हवाई हे अमेरिकेचे प्रशांत महासागरच्या मध्यभागी असलेला एक प्रांत. हा प्रांत बेटांनी वेढलेला आहे. मोआई बेटावरच्या जंगलाला लागलेल्या आगीत मित्राचं घर गेलं म्हणून हजारो मैलांवर राहणारा आठ वर्षांचा ज्युलियन दु:खी झाला. आपल्या मित्राच्या मदतीसाठी उभा राहिला. हे हवाई प्रांतातलं एक बेट. या बेटावरील जंगलाला ऑगस्ट २०२३ मध्ये आग लागली. ही आग म्हणता म्हणता हजारो एकरांवर पसरली. यात शेकडो माणसं मृत्यूमुखी पडली. प्राणी-पक्षी मृत्यूमुखी पडले. जंगलाची मोठी हानी झाली. हजारो लोकांची घरं या आगीत भस्मसात झाली. अनेक लोकं बेपत्ता आहेत. ती जिवंत आहेत की मृत्यूमुखी पडली हे कोणालाही सांगता येत नाहीये. मोआई बेटावरच्या जंगलाला लागलेल्या आगीत मित्राचं घर गेलं म्हणून हजारो मैलांवर राहणारा आठ वर्षांचा ज्युलियन दु:खी झाला. आपल्या मित्राच्या मदतीसाठी उभा राहिला. मोआईच्या जंगलातल्या आगीची बातमी जगभर पसरली. गेल्या काही वर्षांपासून जंगलांना आगी लागण्याचं, वणवा पेटण्याचं प्रमाण जगभरात वाढलं आहे. तशीच ही मोआईची घटना म्हणून अनेकांनी बातमी वाचली आणि वाचून ती विसरुन गेले. पण ८ वर्षांचा ज्युलियन लीन आणि त्याची आई मात्र या बातमीने घाबरले, अस्वस्थ झाले.

हेही वाचा!

खरंतर ज्युलियन हा अमेरिकेतच राहात असला तरी मोआईपासून तो हजारो मैलांच्या अंतरावर राहतो. तरीही मोआई बेटावरील लोकांवर आलेल्या संकटाने ज्युलियन आणि त्याची आई दु:खी झाले. कारण या मोआई बेटावर ज्युलियनचा मित्र रायन राहतो. हा रायन बोट चालवण्याचं काम करतो. ज्युलियन आणि रायन यांची ओळख सहलीदरम्यान झाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये ज्युलियन आणि त्याची आई मोआई बेटावर फिरायला गेले होते. तेव्हा ज्युलियनला बोटीतून फिरवून आणायचा तो रायनच. ज्युलियनला हा बोट चालवणारा रायन खूपच आवडला. त्याची आणि रायनची चांगली मैत्री झाली. आपल्या घरी गेल्यानंतर रायनशी परत बोलता यावं, म्हणून ज्युलियनने त्याचा मोबाइल नंबरही घेतला. त्यामुळे सहलीवरुन परतल्यावरही ज्युलियन मोआई येथील रायनशी कायम संपर्कात होता. रायनने ज्यूलियनला 'अलोहा ' म्हणजे हवाईन भाषेत हॅलो म्हणायला शिकवलं होतं. अलोहा हा हवाईन भाषेतला अत्यंत महत्वाचा शब्द मानला जातो. तसेच रायने ज्यूलियनला आपल्या गळ्यातली मण्यांची माळही दिली. संपूर्ण ट्रूरमध्ये ज्युलियन ती माळ गळ्यात घालून फिरत होता.  या अनेक कारणांमुळे ज्युलियनला रायन घरी आल्यावरही आठवत होता.  

मोआई बेटाला आग लागल्याचं कळताच ज्युलियन आणि त्याच्या आईने रायनला फोन केला. तेव्हा रायनने काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आपल्याप्रमाणे इतर लोकांवरही किती मोठं संकट आलंय हे ही रायनने ज्युलियन आणि त्याच्या आईला सांगितलं. रायनचं घर या आगीत जळून गेलं. त्याचे काका बेपत्ता झाले. हे ऐकून ज्युलियन आणि त्याच्या आईने रायनला आणि इतर लोकांना मदत करायची ठरवलं. काय करता येईल याचा विचार सुरु असतानाच ज्युलियनला घराशेजारी लेमोनेडचा स्टॅण्ड लावायची कल्पना सूचली. आईला ज्युलियनची आयडिया आवडली. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून लेमोनेड स्टॅण्ड लावला. ज्युलियन शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यावर हा स्टॅण्ड लावायचा. या स्टॅण्डवर त्याने मोआईच्या रायनसोबतचे त्याचे फोटो लावले. माओई येथील घटना, रायन आणि मोआई येथील इतर माणसांवर आलेल्या संकटांची माहिती त्यावर लिहिली.

Image: people.com

हेही वाचा!

ज्युलियनने सुरु केलेल्या लेमोनेड स्टॅण्डचं आजूबाजूच्यांना खूप कौतुक वाटलं. लोकं लेमोनेड स्टॅण्डवर यायचे, सरबतं प्यायचे. ज्युलियनकडे यातून पैसे जमू लागले. शिवाय त्याने आईच्या मदतीने ' गो फंड मी' नावाची ऑनलाइन मोहीमही मोआई येथील लोकांच्या मदतीसाठी सुरु केली. लेमोनेड स्टॅण्ड आणि ऑनलाइन फंड रेझिंगद्वारे त्यांनी २,०००डाॅलर्स जमवले आणि ते मोआई येथील मदत निधीला पाठवले. ज्युलियन लहान असला तरी त्याला इतरांना मदत करायला आवडतं. त्याच्या मनातली ही मदतीची भावना इतकी तीव्र होती की मोआई येथील रायानला मदत करण्याचं ठरवल्यावर ती मदत कशी उभारायची याचा पर्याय आणि त्यासाठी शाळा -अभ्यास यातून वेळ कसा काढायचा हा पर्याय दोन्हीही ज्युलियनला सूचलं आणि त्याने ते केलंही! आहे ना कौतुकाची गोष्ट

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact