
Image: sportsadda
एकाच गोष्टीला जगभरात वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं असतात, हे आपल्याला माहीत आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्याला देश आणि भाषा बदलली तरी फरक पडत नाही, त्यांची मूळ नावं कुठेही बदलत नाहीत. पण फुटबाॅलच्या बाबतीत मात्र हे म्हणता येत नाही. अमेरिका आणि कॅनडा येथे फुटबाॅलला साॅकर असं म्हणतात. तर युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका आणि आशियातील बरेच देश अमेरिकेत ज्याला साॅकर म्हणतात त्याला येथे फुटबाॅल म्हणून संबोधलं जातं. खेळ तोच पण साॅकर आणि फुटबाॅल ही दोन वेगळी नावं. हा घोळ का? या घोळाला ब्रिटीश युनिव्हर्सिटीजना जबाबदार धरलं जातं.
हेही वाचा!
साॅकर की फुटबाॅल... एकाच खेळाला दोन नावं का?
१८०० मध्ये ब्रिटीश विद्यापिठांनी फुटबाॅल हा खेळ मध्ययुगीन मानला आणि आपआपल्या पध्दतीने , स्वत:च्या स्वतंत्र नियमांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. नंतर संपूर्ण देशात खेळाचं प्रमाणिकीकरण केले गेले. हा खेळण्याच्या पध्दतीनुसार खेळांचे वर्गीकरण वेगवेगळ्या गटात वेगवेगळ्या नावाने केले गेले. हाताने खेळला जाणारा खेळ रग्बी फुटबाॅल म्हणून ओळखला गेला. केंब्रिज विद्यापिठाने नियम तयार केल्यानंतर १५ वर्षांनी १८६३ मध्ये फुटबाॅल असोसिएशन तयार झाल्यावर त्याला असोसिएशन फुटबाॅल या नावाने ओळखले जावू लागले. नंतर ब्रिटनमध्ये नावांचे लघुरुप करताना रग्बी फुटबाॅलचे लघुरुप रग्बी किंवा रगर झाले असोसिएशन फुटबाॅलचं लघुरुप साॅकर झालं. हे दोन्ही खेळ अटलांटिक खंडात पसरले. अमेरिकेने आपल्या पध्दतीचा, आपल्या नियमानुसारचा खेळ स्वीकारला. असोसिएशन फुटबाॅलचे मग अमेरिकेत साॅकरमध्ये रुपांतर झालं.
१८६९मध्ये अमेरिकेतील रटजर्स आणि प्रिन्टन काॅलेजने पहिली पारंपरिक फुटबाॅल खेळ खेळवला. ज्याची अधिकृतरित्या नोंदही केली गेली. यात साॅकर आणि रग्बी या दोन खेळांचे नियम एकत्र केले गेले. हेच अमेरिकन फुटबाॅल इतरत्र हा खेळ ग्रिडीराॅन म्हणून ओळखला जावू लागला. अमेरिकन फुटबाॅलची लोकप्रियता एकीकडे वाढू लागली तर दुसरीकडे साॅकर खेळणारे खेळाडू साॅकर खेळाला आणि त्या शब्दाला चिकटून राहिले. आणि त्यामुळे अमेरिकेत अमेरिकन फुटबाॅल आणी साॅकरची स्वतंत्र ओळख तयार झाली.

Image: pixabay
दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरिकन लोकांचा ब्रिटनवर मोठा प्रभाव होता. याच प्रभावातून १९८० च्या आधीपर्यंत ब्रिटनमध्येही फुटबाॅलसाठी साॅकर ही संज्ञा वापरली जायची. पण अमेरिकेत हा खेळ जसजसा लोकप्रिय झाला तसा ब्रिटनमध्ये साॅकर हे नाव वापरणं बंद झालं. तिथे त्याऐवजी फुटबाॅल असंच म्हटलं जावू लागलं. पण ब्रिटनमध्ये साॅसर नाव वापरणं का बंद झालं ? याचं नेमकं कारण मात्र माहित नाही.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact