
Image: citylife.chelmsford
नाताळ सणाला ख्रिसमस ट्री सजवण्याची पध्दत माहितीये ना तुम्हाला? अनेक लहान मुलांना आपल्या हाताने हा ख्रिसमस ट्री सजवायचा असतो. मग आई बाबा बाजारात जे प्लॅस्टिकचे ख्रिसमस ट्री मिळतात ते आणून देतात आणि लहान मोठे सर्वजण आपल्या आवडीनुसार ख्रिसमस ट्री सजवतात. तर अनेकांच्या घरासमोर, अंगणातल्या बागेत ख्रिसमस ट्री असतोच. अमेरिकेत तर ३ कोटी अमेरिकन कुटुंब हे खऱ्याखुऱ्या ख्रिसमस ट्री सोबत नाताळ साजरा करतात. ख्रिसमस ट्री सुंदर असतो हे तर आपल्याला माहिती आहेच, पण या झाडाला विशिष्ट आनंददायी सुगंध येतो हे तुम्हाला माहिती आहे का? ख्रिसमस ट्रीला येणारा सुंगध हा नाताळसणासाठीचा माणसांमधला उत्साह आणखी वाढवतो. या ख्रिसमस ट्रीला म्हणे सणाचा सुगंध येतो. ही फक्त कोणीतरी सांगितलेली, कुठून तरी ऐकलेली किंवा पाहिलेली माहिती नाही. तर यावर अभ्यास झाला आहे. हा अभ्यास डस्टीन पाॅपेनडिक यांनी केला आहे. पाॅपेनडिक हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅण्डर्डस ॲण्ड टेक्नाॅलाॅजी या संस्थेत पर्यावरणीय अभियंता म्हणजे एन्व्हार्यमेण्टल इंजिनिअर आहेत. त्यांनी विशिष्ट दिवस खिसमस ट्रीचं निरीक्षण करुन त्याचा अभ्यास करुन या झाडाला येणाऱ्या विशिष्ट गंधाबद्दलची माहिती दिली आहे. निष्कर्ष काढले आहेत.
हेही वाचा!
ख्रिसमस ट्रीला सुगंध येतो कसा? अभ्यास सांगतो की...

Image: /citylife.chelmsford
हेही वाचा!

Image: lancsandyorkssheds
तुमच्या घरातल्या, घराबाहेरच्या, बागेतल्या किंवा मित्र मैत्रिणींच्या घरी असलेल्या ख्रिसमस ट्रीकडे नुसतं पाहू नका, त्यातून अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे खरंच विशिष्ट प्रकारचा गंध येतो का? हा गंध एरवी घरातल्या कोणत्या वस्तूंना येतो याचं तुम्हीही निरीक्षण करा आणि तुम्हाला काय सापडलं ते मला नक्की लिहून पाठवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact