माझ्या स्वप्नात भुतं का येतात? भूत खरंच असतं का?

काेणताही भुताचा सिनेमा पाहिला की माझ्या स्वप्नात भुतं येतात. असं का होतं? मी झोपेत खूप घाबरतो.

- अंकुश इंगळे 

सातवी, देऊळगाव राजा

अरे अंकुश,

तूच काय लहानपणी सगळेच जण भुताला घाबरतात. सगळ्यांच्या स्वप्नात भुतं-खेतं येतात.

image : freepik

ती आपल्याला घाबरवतात. मग एकटेपणाची भीती वाटते. अंधाराची भीती वाटते. दिवे गेल्यावर ज्या सगळ्या सावल्या दिसतात त्यामुळे तर भुतं खरीच आहेत आणि ती त्या सावल्यांसारखीच आहेत असं वाटायला लागतं. सिनेमा बघितल्यामुळे या सगळ्या कल्पनांमध्ये भरच पडते. एखादा अनोळखी आवाज, अचानक झालेला कसला स्पर्श यामागेही ‘भूत’च आहे असं वाटायला लागतं.

 

 

हे वाचा! 

वाळवंटात कुठे बर्फ पडतो का? सहारा वाळवंटात बर्फ पडला हे खरं की खोटं?

पण तुला एक सांगू का, जसजसे आपण  मोठे होतो  ना, तसतशी भुताची भीती कुठल्या कुठे पळून जाते. कारण खरं तर भूत नसतंच. भूत असलंच तर ते कल्पनेत असतं. तू जे सिनेमे बघून घाबरतोस ते सिनेमे तरी कुठे खरे असतात? तीही एक कल्पनाच असते. ते एक नाटकच असतं. हे तुला माहितीये ना? मग आजपासून भुताचे सिनेमे बघणं सोडून दे किंवा बघितलेस तरी त्यावर फार विचार करत बसू नकाेस. गंमत म्हणून भुताकडे बघ आणि भुताची मजा घे.

बाकी, भुताला घाबरू-बिबरू नकोस हं ! शूर हो  !

- श्रुती पानसे

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact