मेंदूची सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

आपल्या मेंदूला वेगवेगळ्या गोष्टी करायला खूप आवडत असतं. त्यामुळे आता जर आपण नवीन शालेय वर्षाची सुरुवात करणार असू , म्हणजे जून ते एप्रिल हे जे आपलं शालेय वर्ष आहे त्या वर्षाची नव्याने सुरुवात करणार असू, तर यावर्षी आपण काय काय करायचं याची एक यादी करून ठेव.
जसं की अभ्यास एके अभ्यास असं केलं तरीही मेंदूला ते फारसं आवडत नाही . कारण त्याला त्यात विशेष चालना मिळत नाही. म्हणून अभ्यासाबरोबर कोणत्या नव्या कला शिकायच्या, कोणत्या नव्या आव्हानांना सामोरे जायचं, कोणते नवे खेळ शिकायचे, अशा अनेक गोष्टी या वर्षाच्या टाईम टेबल मध्ये तुम्ही घालू शकता.
हेही वाचा!
मेंदूला आव्हान देण्यासाठी प्रश्न विचारा! प्रश्न तयार करणे महत्त्वाचे. ते कसे?
जिथे आपल्याला शिकवणारं फार कोणी समजा उपलब्ध नसेल तर इतरांचं बघून करण्याच्या कला सुद्धा शिकू शकतो. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये अनेक चित्र काढलेले असतात. आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा ही चित्र असतात. त्यातलं आपल्याला जे आवडेल व्यक्ती चित्र, निसर्ग चित्र असं चित्र बघून आपण तसंच काढायचा प्रयत्न करायचा. बघून चित्र काढणं, आपलं चित्र बघून त्यात स्वतःच सुधारणा करण, किंवा इतरांची गाणी ऐकून आपण गाणं म्हणायला शिकणं, इतरांसमोर ते गाणं म्हणून दाखवणं, त्यांच्या सूचनानुसार सुधारणा करण, अशा प्रकारे आपल्याला ज्याची आवड आहे ते करायला हवं.
अभ्यास , एक खेळ आणि एक कला असं जर रोज किंवा साप्ताहिक नियोजन करता आलं तर ते मेंदूला खूप आवडतं . कारण यामुळे मेंदूतल्या न्यूरॉन्स पेशी एकमेकांना जुळण्याची शक्यता वाढते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


