पेपर सोडवताना मधे मधे पाणी प्यायल्यास खरंच मार्क्स चांगले मिळतात का?

Image: freepik

परीक्षेला जाताना सोबत पेन-पेन्सिल, कंपास, रायटिंग पॅड यासारखं साहित्य घेतलं की नाही याची आपण खात्री करुन घेतो. पेपर सोडवताना हे साहित्य असणं आवश्यकच असतं. यातलं एक जरी घरी विसरलो तर पेपर नीट लिहिता येणार नाही हे आपल्याला माहित असतं. हे सर्व साहित्य सोबत घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते सर्व घेतलं आहे. या सर्व साहित्याची खात्री करुन घेताना, आपल्या बॅगमध्ये परीक्षेसाठीचं साहित्य भरताना आपण पाण्याची बाटली सोबत घेतली की नाही हे पाहाणंही खूप आवश्यक आहे. परीक्षेला जाताना सोबत पाण्याची बाटली नेणे, पेपर लिहित असताना मधून मधून थोडं थोडं पाणी पिणे ही परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे.

अनेकजण पेपर लिहिताना शू ला जावं लागू नये म्हणून पाणीच पित नाही. असं केल्याने आपण आपला वेळ वाचवला असं जरी त्यांना वाटत असलं तरी परीक्षेतल्या मार्कांच्या दृष्टीने मात्र ही फायद्याची बाब नाही असं शास्त्रज्ञ आणि संधोधक सांगतात.

पाणी पिण्याचा आणि पेपर चांगला जाण्याचा काय संबंध?  

तुम्ही परीक्षेला जाताना सोबत पाण्याची बाटली नेता का? पेपर लिहिताना मधून मधून थोडं पाणी पिता का? याचा परीक्षेत पेपर लिहिण्यावर काय परिणाम होतो, प्रत्यक्ष मार्कांवर याचा काय परिणाम होतो ही बाब शास्त्रीय अंगाने तपासून पाहिली गेली. या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की जी मुलं परीक्षेला जाताना आपल्या सोबत आवर्जून पाण्याची बाटली घेवून जातात, पेपर सुरु असताना मधून मधून पाणी पितात त्यांची कामगिरी सोबत पाणी न घेवून जाणाऱ्यांच्या, पेपर लिहिताना मध्येमध्ये पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत १० टक्के चांगली झालेली होती.

शास्त्रज्ञांच्या मते परीक्षेआधी पुरेसे पाणी प्यायल्याने त्याचा फायदा मेंदूला होतो. तसेच आपल्या सोबत पाण्याची बाटली आहे ही जाणीव मुलांना दिलासा देते. सोबत पाणी बाळगण्याचा, मधे मध्ये पाणी पित राहण्याचा परिणाम प्रत्यक्ष मुलांवर कसा होतो हे विद्यापिठातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलांचा अभ्यास केला गेला. मार्क गार्डनर या संशोधकांच्या मते मुलं अनेकदा परीक्षेला घाबरलेली असतात. त्यांच्या घाबरण्याचा परिणम त्यांच्या पेपर लिहिण्यावर होतो. पण पाणी प्यायल्याने पेपर सोडवताना त्यांना डिहायड्रेशनचा चा त्रास होवू शकतो.

अभ्यासक म्हणतात परीक्षा सुरु असताना मधे मध्ये पाणी प्यायल्याने लक्ष एकाग्र होतं. स्मरणशक्तीला बळ मिळतं. थोड्यावेळापूर्वी इतके मग्न होतात की आपण ऐव्

अभ्यासक म्हणतात परीक्षा सुरु असताना मधे मध्ये पाणी प्यायल्याने लक्ष एकाग्र होतं. स्मरणशक्तीला बळ मिळतं.

हेही वाचा!

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास त्याचा परिणाम मेंदुच्या कार्यावर होतो. विशेषत: निर्णयक्षमता कमी होते. साध्या साध्या गोष्टीचे निर्णयही घेता येत नाही. याबाबत झालेला अभ्यास सांगतो की दुपारी जेवणाच्या सुटीआधी जी मुलं पाणी प्यायलेली नसतात त्यांचं अभ्यासात किंवा प्रश्न पत्रिकेवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता संपलेले असते. जेवणानंतर ही मुलं जेव्हा पेपर लिहिता तेव्ह्या मात्र त्यांच्या कामगिरीत फरक पडल्याचं आढळून  आलं आहे.

पेपरआधी, पेपर सोडवताना मध्ये मध्ये जर पाणी प्यायलं तर आपला मूड सुधारतो. यासंबंधीचा अभ्यास जेव्हा खेळाडूंवर करण्यात आला. हा अभ्यास सांगतो की जे खेळाडू खेळताना जास्त काळ तहानलेले होते, ज्यांनी बराच वेळ पाणी प्यायलेलं नव्हतं त्याचा परिणाम त्यांच्या मूडवर झालेला दिसला. मूड चांगला नाही त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर झालेला दिसला.

पेपर लिहिताना मधून मधून पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम सजगतेवर होत असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे. जर पुरेसं पाणी प्यायलेलं नसेल तर आळस येतो. लक्ष एकाग्र करण्यावर परिणाम होतो. सजगता कमी होते. ऐनवेळी उत्तरं न आठवण्याचा संबंध पाणी न पिण्याशी असतो हे संशोधकांनी दाखवून दिलं आहे.

असं झाल्यास पेपर अवघड जातो. आपल्याला पेपर अवघड गेला आहे या भावनेचा परिणाम पुढच्या पेपरचा अभ्यास करण्यावर , पुढचा पेपर सोडवण्यावर होतो. 

Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact