भक्ती चपळगावकर

Image: outlookindia
सुटी म्हटलं की तुम्हाला काय करु आणि काय नको असं होत असेल ना? स्केटिंगचा क्लास लाऊ की स्विमिंगचा? आजी आजोबांच्या घरी राहायला जाऊ की समर कँपला? आज जेवायला आमरस पुरी खाऊयात की पिज्झा? प्रश्न आणि ॲक्टिव्हिटी हजार आहेत पण सुटीचे फक्त दोन महिने. त्यात टिव्ही, मोबाईलवर काय बघू हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. कारण मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही सगळीकडे एंटरटेनमेंटचा धमाका आहे. पण होतं काय, बऱ्याचवेळा आपण चांगलं काही तरी बघण्याची संधी गमावतो. सध्या एन्फोटेनमेंट म्हणजे माहिती आणि मनोरंजन याची सरमिसळ असलेले अनेक चांगले कार्यक्रम उपलब्ध आहेत. अनेक कार्यक्रम असे आहेत जे तुम्ही, तुमची भावंडं, आईबाबा, मित्रमंडळी मिळून बघू शकाल. अशा चांगल्या चांगल्या कार्यक्रमांबद्दल, चित्रपटांबद्दल, माहितीपटांबद्दल आपण या सदरात जाणून घेऊयात. ते कुठे बघता येतील याची माहिती सुद्धा मी देईन.
हेही वाचा!
आता लहान मुलांना काही समजत नाही असे समजून चालणार नाही. कारण तुमची पिढी आमच्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. तुम्हाला अनेक गोष्टी सहज उपलब्ध सुद्धा आहेत. त्यांचा वापर करुन आपले छंद जोपासणे आणि घरातल्या उपयोगी वस्तू बनवणे हे आता मुले सहजरित्या करु शकतात. तुमच्या आवडीच्या युट्यूब चॅनल्सवर तुम्हाला याची माहिती मिळू शकेल. उन्हाळ्याच्या सुटीत तर मॅग्नेट्स, कीचेन्स, टीशर्ट पेंटिंग, ज्वेलरी बॉक्सेस, ओरिगामी अशा कलाकुसरीच्या गोष्टींची माहिती तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मिळेल. त्याचबरोबर कणिक कशी मळायची, भाज्या कशा चिरायच्या, साधा पण चविष्ट स्वयंपाक कसा करायचा हे तर कळलेच पण अगदी लहान मुलांना चिराचिरी न करता, गॅस न वापरता खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचीही माहिती आता सहज उपलब्ध आहे.

Image: news.arizona
मी तुम्हाला सांगणार आहे...
मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच इतर भारतीय आणि जागतिक भाषांतले उत्तमोत्तम चित्रपट तुम्ही सुटीत बघू शकाल. हॅरी पॉटर, पर्सी जॅक्सन सारखी एक थीम ठरवून त्या विषयाशी निगडीत चित्रपट ठरवून बघितलेत तर तुमच्या आवडत्या कॅरेक्टर्स, लेखक, अभिनेते यांना जवळून जाणून घेण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर साऊंड ऑफ म्युझिक, मेरी पॉपिन्ससारखे सदाबहार सिनेमे कुठे बघता येतील आणि ते का बघावेत याबद्दलही मी तुम्हाला सांगीन.
ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मस्, केबल टिव्हीच्या पलिकडे जाऊन इंटरनेट स्ट्रीमिेगच्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म्स कार्यक्रमाचे प्रक्षेपण करतात. यु ट्यूब, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिस्नी हॉटस्टार, झीफाईव्ह वगैरेच्या यादीत दरवर्षी भर पडत आहेत. यातील अनेक प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मोफत बघता येतात. काहींसाठी फी भरावी लागते. यु ट्यूब सारख्या वेबसाईटवर बऱ्याच गोष्टी मोफत आहेत. थोडक्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या महासागरातून तुम्हाला आवडणा-या आणि उपयोगी पडणा-या अशा अनेक प्रकारच्या कंटेंटची माहिती आपण या सदरातून घेणार आहोत.
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact