आपलं डोकं दुखतं पण मेंदू दुखत नाही.. म्हणजे काय?

का आणि कसं?

Image:ahs.atlantichealth

आपण एरवी एकदम मस्त असतो. शाळेत जातो, अभ्यास करतो, खेळतो, दंगामस्ती करतो. पण शरीरात जरा जरी कुठे दुखलं तर मात्र आपल्याला काहीच सूचत नाही. आपली पाठ दुखते, पाय दुखतो, मान दुखते म्हणजे काय होतं तर शरीरातील वेदना देणाऱ्या संवेदी मज्जातंतू उद्दिपीत होतात आणि आपल्याला वेदना होतात. पण एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ते म्हणजे डोकं दुखत असलं तरी आपला मेंदू दुखत नसतो. आपल्याला वाटतं डोकं म्हणजेच मेंदू. डोकं दुखत असलं की मेंदू दुखणारच. पण मेंदू मात्र दुखत नसतो. यामागे विशिष्ट कारण आहे.

 

 

हेही वाचा!

आपण झोपलो तरी कान कसे झोपत नाहीत? कानांना झोपेतही ऐकू कसं येतं?

मेंदू का दुखत नाही?

  • आपल्या शरीरात त्वचा, सांधे, अंतर्गत अवयवांमध्ये वेदनाग्राहक असतात. पण त्या मेंदूमध्ये मात्र नसतात. त्यामुळेच मेंदूला वेदना होत नाहीत. संशोधन, अभ्यास आणि मेंदूच्या शस्त्रक्रियांमध्ये जागे असलेल्या रुग्णांच्या मेंदूच्या उतींच्या उत्तेजनामुळे वेदना होत नसल्याचं सिध्द झालं आहे.
  • मेंदूला जरी वेदना जाणवत नसली तरी मेंदूभोवतीचे मस्तिष्कावरणात मज्जा तंतू, रक्तवाहिन्या, मानेचे स्नायू यात वेदना जाणवतात.
  •  वेदना संवेदक उद्दिपीत झाल्या की मज्जातंतूद्वारे मेंदूतील मज्जापेशींकडे पाठवतात. त्यामुळे शरीरातील विशिष्ट भाग दुखत असल्याची जाणीव होते.
  • डोकं वेगवेगळ्या कारणांमुळे दुखतं. टेन्शन आल्यानं डोकं दुखतं म्हणजे मान आणि टाळूचे स्नायू घट्ट होतात. चेहरा, तोंड, घसा यात वेदना संवेदक असतात. जर इथे काही समस्या निर्माण झाली तरी डोकं दुखतं.
  •  शरीरातील इतर अवयवांना थेट नुकसान होण्याचा धोका असतो तसा धोका मेंदूला नसतो. त्यामुळे मेंदूमध्ये वेदना संवेदक नसतात.
  •  मेंदूमध्ये जरी वेदना संवेदक नसले तरी मेंदूचं नुकसानीपासून संरक्षण करण्याची यंत्रणा असते.
  •  मेंदू व मज्जारज्जू द्रवपदार्थात मेंदू तरंगत असतो. यामुळे अचानकएखाद्या धक्का बसला तरी मेंदू सुरक्षित राहातो. याशिवाय मेंदू सेलोफेनसारख्या पडद्यामध्ये गुंडाळलेला असतो. यालाच मस्तिष्कावरण म्हणतात. यामुळे मेंदूला आणखी एक संरक्षक थर मिळतो. हा थर मेंदू आणि बाहेरील जगामध्ये एक अडथळा निर्माण करतो.
  • मेंदूत वेदना होत नाही. पण मेंदूला वेदना मात्र जाणवतात. कारण शरीराकडून येणाऱ्या वेदनांच्या संदेशाचे मूल्यांकन आणि अर्थ लावण्याचं काम मेंदूकडून होत असतं . याचाच अर्थ आपला मेंदू हा शरीरातील एक असा भाग आहे ज्याला वेदना जाणवतात पण वेदना होत नाहीत.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact.