आपल्या नाकाला १ लाख कोटी वास ओळखता येतात! ते कसे?

Image: abc.net.au

आपलं नाक किती वास ओळखू शकतं? हे तुम्ही संख्येत सांगू शकाल का? तुम्हाला जर सांगितलं की आपलं नाक म्हणजे मानवाचं नाक १०,००० गंध म्हणजेच वास ओळखू शकतं तर तुम्हाला ते पटेल का? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की मानवाचं नाक १ लाख कोटी वास ओळखू शकतं. तर तुम्ही म्हणाल.. काही काय? बस करा ही फेकाफेकी! पण ही फेकाफेकी नाही. शास्त्रज्ञांनी संशोधन करुन हे सिध्द करुन दाखवलं आहे.

सुरुवातीला मानवाचं नाक १०,००० गंध स्वतंत्रपणे ओळखू शकतं असं मानलं जात होतं. पण नंतर 'सायन्स' या विज्ञान मासिकात प्रसिध्द झालेलं संशोधन मानवाच्या नाकाने उत्तेजना देणारे घटक स्वतंत्रपणे ओळखण्याच्या बाबतीत डोळे आणि कानाच्या क्षमतांवरही मात केली आहे.

न्यूर्याक येथील राॅकफेलर युनिव्हर्सिटीजचे संशोधक म्हणतात की, रोजच्या आयुष्यात आपल्या घाणेंद्रियांच्या एकूण क्षमतेचा खूप छोटा भाग वापरत असतो. मानवाचे डोळे तीन प्रकाश ग्रहणाचा वापर करत १ कोटी रंग स्वतंत्रपणे ओळखू शकतात तर कान ५० लाख ध्वनी ऐकू शकतात. पण नाकाची कामगिरी ही डोळे आणि कानापेक्षाही खूप जास्त आहे.

बऱ्याच काळापर्यंत असं मानलं जायचं की नाक त्याच्या ४०० घाणेंद्रिय ग्रहणाच्या माध्यमातून १०,००० वेगवेगळे गंध ओळखू शकतो. पण न्यूयाॅर्क येथील राॅकफेलरच्या संशोधक वैज्ञानिकांनी १९२७ मध्ये शोधलेली पण न वापरता ती तशीच पडून राहिलेल्या चाचणीचा वापर करुन नाकाच्या गंध ओळखण्याच्या अचाट क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं.

हेही वाचा!

या चाचणीत शास्त्रज्ञांनी लोकांची घाणेंद्रियं १२८ वेगवेगळ्या गंध रेणूंच्या मिश्रणातून किती वास ओळखू शकतात हे शोधण्यासाठी त्या चाचणीचा वापर केला. या गंधाच्या मिश्रणात गवताच्या वासापासून लिंबाच्या वासपर्यंतचे गंध रेणू समाविष्ट केलेले होते.

१०,२०,३० या तीन स्वतंत्र गटात गंध ढोबळमानाने मिसळले गेले. नंतर २६ लोकांना ३ नम्युनांमधले गंध ओळखायला लावले. या ३ नमुन्यात २ नमुन्यांचे गंध सारखे होते तर एका नमुन्याचा गंध वेगळा होता.

संशोधकांनी या चाचणीचे निष्कर्ष मांडताना १२८ गंध रेणू वापरुन तयार केलेल्या मिश्रणातून प्रत्येक व्यक्ती सरासरी किती गंध स्वतंत्रपणे ओळखते या सिध्दांताचा वापर करुन प्रयोग केला असता एक व्यक्ती अंदाजे आपल्या नाकाने १ लाख कोटी गंध स्वतंपत्र ओळखू शकते हे सिध्द झालं.

Image: yourmedguide 

लोकांना वाटतं की माणसांपेक्षा प्राण्यांची गंध ओळखण्याची क्षमता जास्त आहे. पण हे काही खरं नाही. प्राण्यांच्या मेंदुचा जास्तीत जास्त भाग गंधाची जाणीव होण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे प्राण्यांची गंध ओळखण्याची क्षमता ही मानवाच्या तुलनेत दुपटी तिपटीने जास्त आहे. पण म्हणून माणसाच्या गंध ओळखण्याची ताकद कमी होत नाही.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact