लहान मुलांनाच नाही तर चोरांनाही आवडतात पोकेमाॅन कार्ड्स! ते कसे?

Image: cbc.ca

तुम्हाला कार्टून्स पाहायला आवडतात ना? पोकेमाॅनतर तुमचा नक्कीच फेव्हरिट असणार. पोकेमाॅनसारखा जादुई मित्र आपल्याकडेही असता तर काय मजा आली असती, असा विचार तुमच्याही मनात येत असणार. तुम्हाला पोकेमाॅन कार्टून्ससोबतच पोकेमाॅन कार्डसही माहिती असतील.. हो ना? बरोबर पोकेमाॅन कार्डस म्हणजे  मित्र मैत्रिणींमध्ये ज्यांची देवाणघेवाण चालते  असे कार्डस . आपल्याकडेही मित्रांप्रमाणे पोकेमाॅन कार्डसचा सेट असावा असं तर वाटतंच पण सोबतच जे मित्रांकडे नाहीत ते मौल्यवान पोकेमाॅन कार्डस आपल्याकडेही असावेत अशी स्पर्धा ज्या कार्डसमुळे निर्माण होते ते म्हणजे हे पोकेमाॅन कार्डस. हे कार्डस फक्त मुलांनाच आवडतात असं नाही तर चोरांनाही हे पोकेमाॅन कार्डस हवे असतात. त्यासाठी हे चोर पोकेमाॅन कार्डस जिथे मिळतात त्या दुकानांवरही दरोडा घालण्यास मागे पुढे पाहात नाही. हे असंच झालं ते कॅनडामधील दोन शहरांमध्ये. ॲबोटस फोर्ड आणि सरी या दोन शहरातल्या दुकानांमध्ये पोकेमाॅन कार्डसची चोरी झाली. थोडे थिडके नाही तर चोरांनी १० हजार डाॅलर्सची दुर्मिळ पोकेमाॅन कार्डस चोरुन नेलीत. सध्या ही दोन शहरात झालेली चोरी जगभरात चर्चेचा विषय झाली. पण ही चोरी कॅनडातल्या या दोन शहरातच झाली असं नाही तर गेल्या काही वर्षांपासूअ संपूर्ण कॅनडामधील अनेक दुकानांमध्ये चोरांनी पोकेमाॅन कार्डसची चोरी केली आहे.

हेही वाचा!

एका हातात स्पिनर आणि एका हातात टॅबलेट कम्प्युटर घेऊन नवीन बार्बी आली!

Image: radiotimes

कोरोनानंतर पोकेमाॅन कार्डस जगभरात विशेषत: अमेरिका आणि जपानमध्ये खूपच लोकप्रिय झाली.  दुकानदारदेखील या कार्डसच्या लोकप्रियतेमुळे आणि या कार्डसच्या होणाऱ्या चोरीमुळे सावध झाले आहेत. कॅनडामधील अनेक दुकानदारांनी दुकानातली पोकेमाॅन कार्डस काढून घेतली आणि आता जे कोणी याची मागणी नोंदवून ठेवेल त्यांनाच हे कार्डस दिले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  चोर जरी या कार्डसचा पैशांसाठी विचार करत असले तरी मुलांना मात्र  हे कार्डस खेळण्यासाठीच हवी असतात. कोरोनामध्ये लोकं घरात अडकून पडले होते. तेव्हा लोकांकडे भरपूर वेळ होता. अनेकांनी आपल्याकडी पोकेमाॅन कार्डसची आठवण झाली. त्यांनी ऑनलाइन या कार्डसच्या किंमती बघितल्या. तेव्हा लोकांना लक्षात आलं की पोकेमाॅनच्या दुर्मिळ कार्डसना खूपच किंमत आली होती. पोकेमाॅन कार्डसच्या किंमतीत १० पट वाढ झाली होती.कॅनडातील काही दुकानदारांनी त्यांच्याकडील दुर्मिळ आणि मौल्यवान कार्ड  या किंमती बघूनच लोकांना पोकेमाॅनची दुर्मिळ कार्ड आपल्याकडे असावीत असं वाटू लागलं. त्यातूनच पोकेमाॅन कार्डच्या चोरीच्या घटनाही घडू लागल्या. काही दुकानदारांनी २०२१मध्ये जी कार्डस ७ मिलियन कॅनेडियन डाॅलर्सला आणली होती तीच त्यांनी आता २२ मिलियन डाॅलर्सला विकायला सुरुवात केली आहे. जर आपल्याकडील पोकेमाॅनच्या पॅकमध्ये मौल्यवान कार्डस नसतील  तर लोकांचा हिरमोड होतो. त्यासाठी ते भरपूर पैसे मोजून पोकेमाॅन कार्डस घेण्यासही तयार होतात. पण इतके पैसे खर्च करुनही त्यांना ओरिजन पोकेमाॅन कार्डस मिळतीलच याची अजिबात खात्री नसते.

पोकेमाॅनचे कार्डस मिळवण्यासाठी, आपल्या संग्रहात पोकेमाॅनचे दुर्मिळ कार्डस असण्यासाठी लोकं खूप मेहनत करतात. मोठी माणसं पोकेमाॅनच्या कार्डसचा विचार प्रामुख्याने मौल्यवान संग्रहासाठी करतात. पण मुलांना मात्र पोकेमाॅन कार्डस खेळण्यासाठी हवी असतात. या कार्डशी मुलांचं भावनिक नातं असतं. या कार्डसद्वारे मुलं अटॅक, डिफेन्स, प्लॅनिंगचे गेम्स खेळतात. पोकेमाॅन कार्ड्सवरुन 'माझ्याकडे असलेलं पोकेमाॅन कार्ड तुझ्याकडे नाही' असं म्हणून एकमेकांशी स्पर्धा लावतात. आपल्याकडे असलेल्या पोकेमाॅन कार्डसवर बढाई मारतात. तिकडे पोकेमाॅन कार्डसची चोरी होवो किंवा दुकानांवर दरोडा पडो मुलं एकमेकांकडीला कार्ड पाहण्यात, एकमेकांमध्ये कार्डसची देवाणघेवाण करण्यात मग्न असतात.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact