
Image: amsterdamcanalcruises
आता सायकल कोणाला आवडते? सगळ्यांना गाडीवर किंवा गाडीतच फिरायला आवडतं. सायकल ही गोष्ट आता जुनी झाली असं आपल्याला वाटतं का? तर असं नाही. जगात असं एक शहर आहे, ज्याचं सायकलवर खूप प्रेम आहे. या शहरातली माणसं जास्तीतजास्त सायकलच वापरतात. मोठी माणसं ऑफिसला जाताना, कुठे फिरायला जाताना, सहलीला जाताना, बाजारहाट करायला जाताना, मुलांना शाळेत सोडवायला, पाळीव कुत्र्यांना फिरवून आणायला सायकलच वापरतात. सायकलवर इतकं प्रेम करणाऱ्या शहराचं नाव आहे ॲमस्टरडॅम. नेदरलॅंड या देशाची राजधानी असलेलं हे शहर. संपूर्ण नेदरलॅंडमध्येच मोठ्या प्रमाणावर सायकली वापरल्या जात असल्या तरी नेदरलॅंडमधील इतर कोणत्याही शहरापेक्षा ॲमस्टरडॅम या शहरात सायकली इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात की जगात या शहराची ओळख 'सायकलींची राजधानी' (कॅपिटल ऑफ बाइक्स) अशी आहे. या शहराची सायकलची म्हणून एक गोष्ट आहे. जी १९२० मध्ये सुरु झाली . ही गोष्ट आजही सुरु आहे कारण या शहरातल्या लोकांचं सायकलवरचं प्रेम जराही कमी झालं नाही. उलट ते वाढतच आहे.
हेही वाचा!
इतकंच नाही तर परदेशातली माणसं जेव्हा हे शहर फिरायला येतात तेव्हा ते देखील सायकलच्या प्रेमात पडतात. ॲमस्टरडॅम फिरण्यासाठी बाहेरच्या देशातून आलेले पर्यटक भाड्याने मिळणाऱ्या सायकली घेवून शहरभर फिरतात आणि सायकल चालवण्याचा आणि सायकलवर फिरुन हे सुंदर शहर शांतपणे अनुभवण्याचा आनंद घेतात. ॲमस्टरडॅम या शहराची भौगोलिक रचना आणि तिथलं वातावरणही सायकल वापरण्याच्या दृष्टिकोनातून अनुकुल आहे. ॲमस्टरडॅम शहरात सुरुवातीला लोकं सायकल वापरायला लागले ते ती गाड्यांच्या तुलनेत परवडते म्हणून. सायकल लोकांना परवडत होती नंतर ती आवडू लागली. असं असलं तरी आधुनिकता जशी आली तशा गाड्याही या शहरात यायला लागल्या. गाड्यांच्या तुलनेत सायकलवरचं प्रेम टिकवून ठेवण्याची या शहराची गोष्ट मोठी रंजक आहे.
ॲमस्टरडॅम शहराची सायकलची गोष्ट

Image: santorinidave

Image: dutchnews.nl
हेही वाचा!
ॲमस्टरडॅम हे सायकलचं शहर झालं, हे अशा प्रकारे एका रात्रीत झालं नाही. त्यासाठी लोकांना सतत आंदोलनं करावी लागली. आजही या शहरातले नागरिक बाइक सिटी ही आपल्या शहराची ओळख टिकवण्यासाठी जागरुक आहेत.
पण आता ॲमस्टरडॅम शहरात सायकलींची संख्या इतकी वाढली आहे आता सायकलींमुळे शहरात कोंडी व्हायला लागली आहे. आज या शहराची जितकी मूळ लोकसंख्या आहे त्यापेक्षा आधिक सायकलींची संख्या आहे. शहराची लोकसंंख्या ७, ८०, ५५९( सात लाख ऐंशी हजार पाचशे ऐकोणसाठ) आहे तर सायकलींची संख्या मात्र ८,८१,००० ( आठ लाख ऐक्यांशी हजार) इतकी आहे.

Image: travelmamas
शहराच्या भौगोलिक रचना, शहराचं ऐतिहासिक महत्त्व आणि नागरिकांची सुरक्षा हे सर्व लक्षात घेवून सायकलीचा पर्याय निवडणारे ॲमस्टरडॅम हे जगातलं एकमेव शहर आहे. सायकलीचा पर्याय निवडायला धैर्य लागातं. ते धैर्य ॲमस्टरडॅमने दाखवलं म्हणून आज जगात या देशाची एक वेगळी ओळख आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact