-शिवान दर्डा
गाडी घेतांना शाश्वत उर्जेवर चालणारी गाडी घेण्याची संधी पालकांनी साधली पाहिजे. कारण त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य जास्त सुरक्षित होऊ शकतं. या गाड्यांचं ऊर्जेची बचत करणारं डिझाईन आणि उत्तम इंजिन किंवा इंधनाची किंमत यापलिकडे जाऊन या गाड्यांचे इतरही अनेक फायदे आहेत. या गाड्यांची निवड करण्यामागची ही काही कारणं आहेत.

वातावरणावर होणारा परिणाम
पर्यावरणस्नेही गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांचा समावेश होतो. या गाड्या कमी प्रमाणात हरितगृह वायू सोडतात, त्यामुळे या गाड्या वापरणाऱ्यांच्या कार्बन फूटप्रिंट्स कमी असतात. या गाड्या वापरून पालक आपल्या मुलांना स्वच्छ हवा, कमी प्रदूषण आणि हरित वाहतूक व्यवस्था असणारं भविष्य देऊ शकतात.
मोकळा श्वास…
हिरवी नंबर प्लेट घेण्यामुळे कुटुंबासोबतच पर्यावरणाचाही फायदा होतो. या गाड्यांमुळे हवेचा दर्जा सुधारतो, त्यामुळे आयुष्याचा दर्जा सुधारतो. मुलं जास्त स्वच्छ हवेत मोठी झाली, तर त्यांना मोठेपणी देखील श्वसनाचे त्रास कमी होतात.
हेही वाचा…
एक फोटो खूप काही सांगतो! विहानने काढलेल्या फोटोने वेधलं जगाचं लक्ष!

आर्थिक शहाणपणाचा निर्णय
विकत घेतांना इलेक्ट्रिक वाहनं काहीशी महाग वाटू शकतात, मात्र त्यांचे दीर्घकालीन फायदे खूप असतात. उदाहरणार्थ, या गाड्यांना चालवण्याची आणि देखभाल करण्याची किंमत कमी असते. त्यामुळे त्या शेवटी स्वस्त पडतात. म्हणजेच कुटुंबाकडे इतर गरजा भागविण्यासाठी जास्त पैसे उरतात.
पर्यावरणस्नेही उदाहरण
पालक हे मुलांचे पहिले आदर्श असतात. पर्यावरणस्नेही गाडीची निवड करून ते मुलांसमोर पर्यावरणाचं रक्षण करण्याचा आदर्श ठेवतात. त्यामुळे पुढच्या पिढीत पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असल्याची भावना वाढीस लागते.
पर्यावरणस्नेही गाडी वापरणं म्हणजे केवळ तुमची गाडी बदलणं असं नसतं; तर तो पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा एक भाग असतो. पालकांनी अशी गाडी विकत घेणं म्हणजेच पर्यावरणाचा विचार करणं, आरोग्य सांभाळणं आणि पैसेही वाचवणं होय.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


