
Image: ebird
पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. मग ती साधी मुंगी असली तरी तिला तिची म्हणून काही वैशिष्ट्यं असतात जी इतर किटकांपेक्षा मुंगीला वेगळी ठरवतात. तसेच प्रत्येक प्राणी पक्ष्याच्या बाबतीतही आहे. पण एक पक्षी असा आहे जो त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे इतर पक्ष्यांपेक्षा फारच वेगळा ठरतो. हा पक्षी म्हणजे 'स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार'. उत्तर आफ्रिकेतील सावाना या उष्ण गवताळ प्रदेशात हा पक्षी आढळतो. या पक्ष्याचा व्हिडीओ नुकताच समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या पक्ष्याचं उडणं बघून अनेकांना हा कोणता पक्षी असा प्रश्न कुतुहलाने पडला. असं काय वेगळं आहे या स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार पक्ष्याच्या उडण्यात? तर हा पक्षी आपल्या चार पंखांनी उडतो. पण सगळेच स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार पक्षी काही चार पंखांनी उडत नाही. शिवाय जे चार पंखांनी उडतात तेही सदा सर्व काळ उडताना चार पंख घेवून उडत नाही. एका विशिष्ट काळापुरतीच स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार हा पक्षी चार पंखांनी उडतो. एवढी माहिती सांगितली तरी या स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार पक्ष्याविषयी अनेक प्रश्न तुम्हाला पडलेच असतील ना?
हेही वाचा!
स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार

Image: hotcore

Image: thebukaruproject
आपल्या डोक्यात पक्षी म्हणून जी चित्रं पक्की बसलेली असतात त्या पक्ष्यांपेक्षा खूप वेगळे आहेत ना हे स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार पक्षी. 'एक्स' या समाजमाध्यमावर या पक्ष्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उडण्याचा व्हिडीओ आहे. तो व्हिडीओ आपल्या आई बाबांच्या फोनवर त्यांच्या परवानगीने एकदा बघाच. चार पंखांनी उडणारा पक्षी कसा दिसतो? तो चार पंखांनी कसा उडतो अशा प्रश्नांची उत्तरं हा व्हिडीओ पाहून सहज मिळतील.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact