
Image: freepik
आपल्याला जे प्राणी खूप क्यूट वाटतात, त्यांना बघताक्षणी मिठी मारावी असं वाटतं त्या प्राण्यांमधला एक प्राणी म्हणजे पांडा. अतिशय शांत आणि प्रेमळ अशी पांडाची मुख्य ओळख आहे. पण ती खरी आहे का? पांडा म्हणजे अस्वलाचाच एक प्रकार. अस्वलाच्या कुळातला हा प्राणी खरंच कोणाला काहीच करत नसेल, तो कोणालाही त्याला हात लावू देत असेल, कोणी त्याला प्रेमाने मिठी मारायला गेलं तर सहज मिठीही मारु देत असेल असंच आपल्याला पांडाकडे बघताना वाटतं ना. पण पांडाच्या बाबतीत ते खरं नाहीये. प्रेमळ वाटणारे पांडाही प्रसंगी हिंसक होतात. खूप नाही पण अनेक घटना अशा घडल्या आहेत ज्या पांडाबद्दलचे आपल्या मनातले समज खोटे ठरवतात. शांत वाटणारे पांडा प्रत्यक्षात जेव्हा काही कारणांनी घाबरतात तेव्हा मात्र पांडाही डेंजर असतात याची खात्री पटते.
हेही वाचा!
प्रेमळ पांडा डेंजर कसे होतात?

Image: i.pinimg
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ॲण्ड एक्सपिरिमेंटल मेडिसन' या नियतकालिकाने जायंट पांडा प्रसंगी आपण कसे हिंसक होतात आणि त्यांच्यापासून सर्वांनी कसं सावध राहायला हवं' हे पटवून देण्यासाठी त्यांनी पांडांच्या आक्रमतेची काही उदाहरणं दिली आहे. एका घटनेत 'बीजिंग सिटी झू' मधील पांडाच्या बंदिस्त जागेत एका पर्यटक व्यक्तीने उडी मारली आणि पांडाला पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गांगरुन गेलेल्या पांडाने त्या व्यक्तीवर हल्ला चढवला . पांडाच्या या बचावात्मक हल्ल्यात ती व्यक्ती चांगलीच जखमी झाली. त्या व्यक्तीला पांडाने मोठ्या जखमा केल्या. तर दुसऱ्या घटनेत दोन पर्यटक चुकून पांडाच्या बंदिस्त जागेत आले असता त्यांनाही पांडाने बेदम चोपून काढलं. एका घटनेत तर चीनी वन्यजीव संवर्धन म्हणून काम करणारे वेई हुवा जे पांडाची काळजी घ्यायचे त्यांच्यावरच पांडाने आक्रमण केले. पांडाच्या या हल्ल्यात वेई हुवा यांचा घोटा चिरला गेला, हाडं मोडली, स्नायू दुखावले. हाताच्या पंजाला मोठी जखम झाली.

Image: bestlifeonline
पांडाने घाबरुन स्वत:च्या सुरक्षेसाठी माणसावर हल्ला केला असला तरी पांडा माणसाला जिवे मारुन टाकत नाही. पण पांडा जिथे आहेत तिथे वावरताना काळजी घ्यायला हवी असा संदेश मात्र पांडाने आपल्या वागण्यातून जगभरातल्या लोकांना दिला आहे.
इतर नर पांडा जेव्हा मादी मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात तेव्हा नर पांडा चिडून एकमेकांवर आक्रमण करतात, एकमेकांना जखमी करतात.
पांडा हे शांत आणि गतीने मंद आहे असं वाटत असलं तरी ते इतर अस्वलांच्या तुलनेने खूपच क्रियाशील असतात. पांडा हे काही विशिष्ट काळ निद्रावस्थेत असतात असं नाही. ते सदैव क्रियाशील असल्याने ते सतत आपल्या अन्नाचा शोध घेत राहतात.
जायंट पांडा हे आळशी नसतात फक्त त्यांना आरामशीर राहायला आवडतं. 'ते जसे दिसतात तसे ते नाही' हे वाक्य पांडांच्या बाबतीत अगदी खरे आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact