वरण भात लावताना, पोळ्या करताना मेंदू काय काय शिकतो?

मेंदूचे सिक्रेटस

- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

तुला सुट्टीत एखादा नवीन पदार्थ करायला शिकता आला का? तुला माहितीये, जर एखादा नवीन पदार्थ करायला शिकलो तर तो पदार्थच आपल्याला खूप काही शिकवत असतो. उदाहरणार्थ, डाळ - तांदूळ घेऊन ती कुकरमध्ये लावून शिजवली, हा एक साधा पदार्थ आहे. ते करताना काय काय शिकलो? माणसांच्या संख्येवरून किती वाट्या तांदूळ लागतो ? तो कसा धुवायचा? त्यातलं पाणी कसं न सांडता कसं निथळायचं? त्यामध्ये किती पाणी घालायचं म्हणजे भात व्यवस्थित शिजतो? कोणती डाळ शिजवायची? वरण-भात खाऊन शरीराला कोणत्या प्रकारचं पोषण मिळतं? ही माहिती मिळवावी लागेल.

हेही वाचा!

जगात पहिलं दही कसं लागलं असेल?

पोळ्या आपल्याला काय शिकवतात? साधारण किती आकाराच्या परातीमध्ये किती पीठ भिजवलं तर जास्त सांडत नाही. पिठाला हळूहळू पाणी घालावं लागतं. एकदम पाणी घालून चालत नाही. एक वाटी पिठाला साधारण किती पाणी लागतं याचा अंदाज आपण शिकतो. गव्हाचं पीठ हाताला चिकटून बसतं. यातून गव्हाच्या पिठाचा चिकटपणा हा गुणधर्म कळतो. हे चिकटलेले पीठ चिडचिड न करता कसं काढायचं? हे आपल्याला सरावाने येतं. त्यासाठी तेल किंवा कोरडं पीठ मदत करतं. अशाच प्रकारे नवीन पदार्थ कितीतरी गोष्टी शिकवत असतात. भाजी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येते, त्याचा अंदाज हे सर्व ‘शिकणं’ आहे.
स्वयंपाकघर ही पहिली प्रयोगशाळा असते, असं विनोबा भावे म्हणायचे. जेव्हा आपण काहीही शिकत असतो, तेव्हा मेंदूतले न्यूरॉन्स एकमेकांशी जुळत असतात. ही जुळणी मेंदूविकासासाठी अतिशय गरजेची असते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact