जगात पहिलं दही कसं लागलं असेल?

जगात पहिलं दही कसं लागलं असेल?

- सागर दामले.

Image - Google

अरेच्चा.... हे माझ्या कधी डोक्यातच आलं नव्हतं.

खरंच! कारण आज दही लावायचं असेल तर कोमट दुधाला, उपलब्ध दह्याचे विरजण लावतात मग दुसरे दिवशी दही लागते हेच माहिती.

छोट्या दोस्तांनो.. असे प्रश्न पडणे खूप महत्त्वाचे आहे बरं का?

इतिहासात पहिल्यांदा दही कोणी लावलं याचा लिखित पुरावा उपलब्ध नाही पण विज्ञानाने दह्याचं कोडं सोडवायला नक्की मदत केली हे खरे.

दुधापासून दही तयार होण्यासाठी लॅक्टो बॅसिलस नावाच्या जिवाणूंची, योग्य प्रमाणात आवश्यकता असते. त्यांच्या संख्येत जशी वाढ होत जाते, दही तितकेच आंबट होत जाते. आता हे जिवाणू दुधात आधीच उपलब्ध असतात, त्यांना वाढीसाठी पोषक वातावरण लागतं म्हणजे या जीवाणूंना कोणीतरी टपली मारावी लागते की उठा आणि दुधातील केसिन नावाच प्रथिन गोळा करायला सुरुवात करा.

चला तर मग हा प्रयोग करूनच पाहू.

1. आज रात्री, एका छोट्या वाटीत थोडे कोमट दूध घ्या.
2. त्या वाटीत, चार पाच बदाम किंवा मिरच्यांची देठे स्वच्छ धुवून घाला. हे दोघे त्या जीवाणूंना टपली देतात.
3. वाटी झाकून ठेवून द्या.
4. उद्या सकाळी दही लागलेले असेल.
5. मग हेच विरजण वापरून अर्ध्या लिटर कोमट दुधाला विरजण लावा.
6. विरजण चमच्यात घ्या, दोन तीन थेंब पाणी घाला. एकत्र करा.
7. या विराजणाच्या चमच्याचे दुधात किमान 100 वळसे घाला.. म्हणजे दही मस्त लागेल.

आता या दह्याचे कोणते पदार्थ होऊ शकतात? चालवा डोके, करा यादी!