अभ्यास करायचा तर वह्या पुस्तकं लागणार, मग झाडं कशी वाचणार?

Image: freepik

पर्यावरणाचं संरक्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे झाडं लावणं, झाडांचं संवर्धन करणं असं मोठी माणसं शिकवतात. पुस्तकातही लिहिलेलं असतं. पुस्तकातल्या ज्या पानावर फुललेल्या झाडाचं चित्रं असतं, वहीच्या ज्या पानावर आपण हिरव्यागार झाडाचं चित्रं काढतो ती पानं कागदाची असतात आणि कागद बनवण्यासाठी झाडं तोडावी लागतात. मग झाडं तोडू नका सं सांगणारं पुस्तक तयार करण्यासाठी झाडं तोडली तर झाडं कशी वाचतील असा प्रश्न गोव्याच्या मंदार कामतला पडला. त्याने तो ऊर्जाला मेल करुन विचारला. मंदारसारखी अशी खूप मुलं आहेत जे संवेदनशीलतेने आपल्या पर्यावरणाचा विचार करतात. मोठं व्हायचं तर अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करण्यासाठी वह्या पुस्तकं लागणारच, मग आपली झाडं कशी वाचणार हा अगदी नेमका प्रश्न आहे. कागद वाचवून आपण झाडं वाचवू शकतो हा त्यावरचा पर्याय आहे.

हेही वाचा!

पण मग कागद वाचवायचा कसा?

कागद बनवण्यासाही एकदा वापरलेले जुने कागद, चिंध्या आणि झाडांची खोडे उपयोगी पडतात. मात्र कागद बनवण्यासाठी मुख्यत: आपण झाडांवरच अवलंबून असतो, हे खरं आहे. 

जर जंगले असतील तर झाडं मिळतील आणि झाडं असतील तर आपल्याला त्याचे लाकूड जळणासाठी आणि कागद बनवण्यासाठी मिळणार. पण मुद्दलातच जंगले कमी म्हणून झाडं कमी आणि झाडं कमी म्हणून मग कागद, जळण आणि इतर वापरासाठीच्या लाकूड वापरावर बंधनं येणार. एका बाजूनं लोकसंख्या सातत्यानं वाढत आहे. लोकसंख्येच्या गरजा नाना प्रकारच्या असतात. त्यांना घरं, शाळा, रुगालयं, देवळं, फर्निचर, कपडे, अन्न , वस्त्र, औषधं , घरात उपकरणं अशा खूप गोष्टी लागतात आणि या सगळ्यांसाठी जंगलातून मिळणाऱ्या नाना गोष्टी लागतात. तेव्हा जर कोणत्याही विकासासाठी जंगलाखालची जमीन वापरायची असेल तर जंगले नष्ट करताना जेवढी झाडं कापली तेवढी झाडं आपण रिकाम्या जागांवर लावली पाहिजेत. खरं म्हणजे कापलेल्या झाडांच्या संख्येच्या दुप्पट संख्येनं झाडं लावली पाहिजेत. कारण लावलेली सगळीच झाडं जगत नाहीत. 

 Image: ..freepik

Image: .freepik

दुसरा मार्ग म्हणजे आपण कागदाला पर्याय शोधला पाहिजे. किंवा आपण कागदाचा उपयोग करताना तो जास्तीत जास्त आणि काटेकोरपणे वापरुन कागद आणि पर्यायानं झाडं वाचवू शकतो. अभ्यास करायचा तर वह्यांवर लिहावं लागतं. पण मोठी, ढबरी अक्षरं न काढता बारीक पण वळणदार अक्षरं काढायाल शिकलं पाहिजे. त्यामुळे वहीच्या एका पानावर जास्तीचा मजकूर लिहिता येईल. 

नीटनेटकेपणासाठी अनेकजण वहीवर लिहिताना पाठपोट लिहित नाही. पण असं केल्यानं लिहिण्यासाठी जास्त पानं लागतात. त्यामुळे पानाच्या एकाच बाजूला न लिहिता पानाच्या दोन्ही बाजूंचा वापर करावा.  अभ्यास करताना विशेषत: लिहिताना नीटनेटकेपणाची सवय लावली तर आपोआपच वहीवर खाडाखोड होणार नाही, आणि वह्यांची पानं वाया जाणार नाही. अभ्यासातला नीटनेटकेपणा जपूनही आपण झाडं वाचवू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करु शकतो. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact