
Image: materialworldsingapore
अनिष नववीत शिकणारा मुलगा. त्याने मला मेल करुन त्याची समस्या सांगितली. अनिष म्हणतो की, ' माझं अभ्यासात लक्षच लागत नाहीये. मला अभ्यास अवघड वाटतोय. अभ्यासाला स्वत:हून बसावंसच वाटत नाही. पण मी अभ्यास केला नाही तर मी नापास होईन, पण मला नापास व्हायचं नाही!' अनिषला अभ्यासाच्या बाबतीत मदत हवी आहे. अनिषची ही समस्या मी अभ्यासातल्या तज्ज्ञांना सांगितली. त्यांनी अनिषच्या अभ्यासातल्या अडचणीवर सोपे उपाय सूचवले आहेत. तज्ज्ञ म्हणतात अनिषला जे अभ्यासाबद्दल वाटतं तशी समस्या अनेक मुलांच्या बाबतीत आहे. अभ्यास अवघड वाटणं, आपण अभ्यासात मागे पडतोय असं वाटून अभ्यासाच करावासा न वाटणं हे असं होतं. पण म्हणून अभ्यास होणारच नाही, अभ्यासात मन लागणारच नाही असं नाही. स्वत:हून चांगला अभ्यास करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
हेही वाचा!
अभ्यास मनापासून करण्यासाठी!

Image: creazilla
हेही वाचा!

Image: htschool
हेही वाचा!
अभ्यास मन लावून करण्यासाठीच्या या आयडिया सोप्या आहेत ना? अनिषप्रमाणे तुम्हालाही अभ्यासाबाबत अडचणी येत असल्यास मला मेल करुन त्या अडचणी नक्की कळवा. माझ्याकडे अभ्यासाच्या समस्या सोडवण्याच्या अनेक युक्त्या आहेत. शिवाय अभ्यासातल्या समस्यांवर मार्गदर्शन करतात अशा अभ्यासातल्या तज्ज्ञांशी मैत्रीही आहे. अभ्यासाबाबतच्या तुमच्या समस्या सोडवायला आणि तुमचा अभ्यास सोपा करायला ते नक्की मदत करतील!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact