दिसायला देखणा, चवीला चटकदार चीज- चेरी -पायनापल

स्वयंपाकघरातली लुडबुड

- आरती परिचारक

Image: freepik

असं म्हणतात की माणूस जेवायच्या आधी डोळ्याने तो पदार्थ चाखतो. दिसायला छान असला की त्याचा अप्रूप आपल्याला वाटतं. त्यात असं वेगळं देखणं असं काही चाखायला मिळालं तर मज्जाच! चीझ, चेरी आणि अननस यांचा वापर करून एक सोपा आणि चवदार स्नॅक बनवायचा असेल, तर ही रेसिपी नक्की करून बघा. यासाठी अननस, चेरी आणि चीज यासारखं साध, सहज उपलब्ध होणारं साहित्य वापरायचं आहे. हा पदार्थ करताना थोडी आई-बाबांचीही मदत घ्यावी लागेल. आपल्याबरोबर त्यांना पण आवडणारी चटकन होणारी. दिसायला छान असणारी, सगळ्यांकडून कौतुक करून घेता येणारी ही रेसिपी आहे.

 हेही वाचा! 

साबुदाण्याचा पदार्थ करुन पाहावासा वाटतो का? खिचडी वडे हे तर नेहमीचे. तुम्ही करा दही साबुदाणा!

तुम्ही हीच पद्धत वापरून अशा वेगवेगळ्या डिश करुन पाहू शकता. चीज- चेरी -काकडी,पनीर / चीज- टोमॅटो- पनीर- ढोबळी मिरची/ उकडलेला बटाटा- काॅर्न दाणे- पनीर- चीज... अशी अनेक वेगवेगळी काॅम्बिनेशन करून तुम्ही खूप पदार्थ तयार करु शकतात. पटकन,चटकमटक, आईला विशेष त्रास न देता आपण हे असले पदार्थ नक्कीच करू शकता. तर अशी ही चीज चेरी पायनॅपल रेसिपी करुन पाहायची का?

चीज चेरी पायनापल
साहित्य: दोन चीज क्यूब, सात ते आठ चेरीज पायनॅपलचे दोन ते तीन गोल गोल स्लाईस किंवा टिन मधला पायनॅपल, टुथपिक.
कृती:: चीजचे चौकोनी छोटे छोटे तुकडे करून घ्या. चेरीचे अर्धे अर्धे काप करून घ्या. पायनापलचे पण छोटे तुकडे करून घ्या. आता टुथपिकला पायनापलचा तुकडा नंतर चिझचा तुकडा चेरीचा तुकडा लावा . मस्तपैकी चीज-चेरी-पायनापल तयार.

( लेखक 'मुंबई स्वयंपाकघर' फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत)