एक रुपयाच्या नाण्यावर पाण्याचे किती थेंब राहू शकतात?

images : fizzics education

शाळेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला सांगतात. त्यातही बरेच प्रयोग शाळेत करून दाखवतात. पण प्रयोग हे काही फक्त प्रयोगशाळेत करायचे नसतात. आपण घरात, मैदानात किंवा बागेतसुद्धा छोटे छोटे प्रयोग करून बघू शकतो. प्रयोग करण्यासाठी दर वेळी खूप साहित्य लागतं असंही नसतं. आपण काय केलं आणि त्यामुळे काय झालं याचं निरीक्षण करणं, त्यामागचं विज्ञान समजून घेणं आणि त्याचा रोजच्या आयुष्यात कुठे उपयोग होऊ शकतो का हे बघणं हा प्रयोग करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. असाच एक सोपा प्रयोग खाली दिला आहे. तो नक्की करून बघा. हा प्रयोग करताना तुम्ही मनात बांधलेला अंदाज कसा चुकतो हे ही तुमच्या लक्षात येईल.

 

 

हेही वाचा!

निर्जीव वस्तूलाही दूध पाजता येतं! हा चमत्कार नाही विज्ञान आहे.

साहित्य : एक रुपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपर

कृती :

१. एक रुपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. 

२. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा. 

३. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. 

४. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका.

५. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा. 

६. बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.

असे का होते?

पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी ओसंडून वाहते. 

- मराठी विज्ञान परिषद, 

पुणे विभाग

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact