निर्जीव वस्तूलाही दूध पाजता येतं! हा चमत्कार नाही विज्ञान आहे.

images : google

बऱ्याच वर्षांपूर्वी “गणपती दूध पितो” अशी अफवा महाराष्ट्रभर पसरली होती. जिथे जिथे गणपतीचं मंदिर असेल तिथे लोक मोठमोठ्या रांगा लावून गणपतीच्या मूर्तीला एक एक चमचा दूध पाजत होते. जवळजवळ आठवडाभर त्याच्या बातम्या आल्या, लोकांनी त्याबद्दल चर्चा केली. पण हळूहळू तो विषय मागे पडला. पण अशा घटना अधून मधून घडत असतात. आणि दर वेळी लोकांना तो चमत्कार वाटतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की तुम्हीही तुमच्या घरातल्या वस्तूंना चमच्याने थोडंसं दूध पाजू शकता? हा प्रयोग करताना तुम्हाला त्यामागचं कारणही नक्की कळेल!

 

 

हेही वाचा!

किहार्सक्युरो ही कला तुम्हाला शिकायची आहे का?

वस्तूंना दूध पाजण्याचा प्रयोग कसा करायचा?

साहित्य : विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.

कृती :

१. एक लाकडी फळी घ्या. 

२. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा. 

३. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील अशी ठेवा. 

४. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या. 

५. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा. चमचा किंचित तिरपा करा. 

६. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल.

७. दुधाचा पातळ थर वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.

असे का होते?

दूधाच्या पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.

- मराठी विज्ञान परिषद,

 पुणे विभाग

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact