जेवणाची मांडामांड आणि नंतरची आवराआवर करता का?

स्वयंपाकघरातली लुडबुड

- मानसी होळेहोन्नूर

Image: freepik

दोस्तांनो, तुम्ही हॉटेल मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथला शेफ दिसतो का? पण तरीही तुम्हाला तुमचे जेवण टेबलवर मिळते. यात मोठी भूमिका असते ती वेटरची! ते आपल्यासाठी ताट, वाटी, पेले, चमचे सगळे मांडून ठेवतात, आपल्याला वाढतात. यात पण एक वेगळीच मजा असते बरं का. आता हेच बघा की घरी आपण जेवायला बसण्यापूर्वी तयारी नीट केली नाही तर मध्येच आईला, आजीला नाही तर इतर कोणाला तरी उठावे लागते ना, म्हणून जेवणाआधीची तयारीसुध्दा तितकीच महत्त्वाची असते.

ज्या दिवशी पास्ता, नूडल्स असतात त्यावेळी काटे चमचे, खीर, कढी असते तेव्हा वाट्या आवश्यक असतात. भात वाढायचा चमचा वेगळा, आमटी, पातळ भाजीसाठी डाव किंवा पळी वापरायचा असते म्हणजे ते वाढताना सांडत नाही. चटणी, लोणचे, तूप या सगळ्यासाठी वेगळे चमचे वापरले तर ते खराब होत नाहीत. जेवताना पाण्याचे पेले आहेत ना हे बघणे ही महत्त्वाचे असते.

हेही वाचा!

आई बाबा त्यांच्या लहानपणी काय खाऊ खायचे माहिती आहे का?

जेवण झाल्यानंतरची आवराआवर तर याहून महत्त्वाची असते कारण खरकटी भांडी तशीच राहिली तर मुंग्या, झुरळ यांना दिलेले ते खास आमंत्रण असते. त्यामुळे खरकटी ताट, वाट्या धुवायला ठेवताना ताटात टाकलेले अन्न ओल्या कचऱ्याच्या पिशवीत टाकून, पाणी घालून ठेवले तर भांडी घासणे सोपे होते. स्वयंपाक केलेली भांडी थेट फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा उरलेली, भाजी, आमटी, भात छोट्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवली तर ऊर्जेची सुद्धा बचत होते. जेवणाची मांडामांड करून नंतर आवरण्याऱ्याला आवडीचा खाऊ मिळतो असे चिनी भाषेत म्हणतात. बघा बरे तुमच्या घरी पण असे होते का?

(लेखक  'मुंबई स्वयंपाकघर' फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत.)

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact