टी.व्ही मोबाइलच्या स्क्रीनवरचे सगळे रंगच उडून गेले तर?

मेंदूची सिक्रेटस

- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

आपल्या मेंदूच्या उजव्या भागामध्ये रंगांचं स्थान असतं आणि मेंदूला रंग अतिशय आवडतात. फक्त काळ - पांढरं असं जास्त वेळ बघायला फारसं आवडत नाही. त्यातही निसर्गातला हिरवा रंग अतिशय सुखावतो. जे मनाला शांत करणारे रंग असतात, त्यामध्ये हिरवा - आकाशी - गुलाबी - हलका निळा - अबोली असे काही रंग समजले जातात. लाल - पिवळा - मोरपंखी हे रंग मेंदूला ऊर्जा देणारे असतात. त्यामुळे अशा सर्व रंगांची सरमिसळ मोबाइल स्क्रीनवर वापरली जाते. विशेषतः लाल – पिवळा - मोरपंखी - गडद हिरवा अशा रंगांची रेलचेल असते. म्हणून आपण सतत त्या मोबाइलला खिळलेलो असतो.
रंग आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात. अधिकाधिक मोबाइल बघायला उद्युक्त करतात. स्क्रीनवरचे रंग काढून टाकले तर आपल्याला जास्त वेळ स्क्रीनकडे बघण्याचा कंटाळा येऊ शकतो.

हेही वाचा

नुसता अभ्यास नको. मेंदूला दंगा मस्ती आणि धम्मालही आवडते!

काही वर्षांपूर्वी आपल्या सिनेमात सुद्धा काळा आणि पांढरा हे दोनच रंग दिसायचे. त्याही सिनेमांमध्ये खूप सौंदर्य होतं. पण त्यानंतर जेव्हा सिनेमांमध्ये विविध रंग वापरले जाऊ लागले. टीव्हीसुद्धा रंगीत झाला. त्यानंतर पुन्हा कोणी उलट काळ्या पांढऱ्या सिनेमाकडे फारसे गेलं नाही. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की खूप सारे रंग हे आपल्या मेंदूला खिळवून ठेवतात. स्क्रीनवरचे रंग काढून टाकले तर मात्र आपण थोड्याच वेळ स्क्रीन बघू. आता नवीन आलेल्या काही हँडसेटमध्ये रंग काढून टाकण्याची एक नवीन सुविधा निर्माण झालेली आहे. त्याचा वापर केला तर आपला स्क्रीन बघण्याचा वेळ नक्कीच कमी होईल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact