
खरं म्हणजे पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी खूप ऊर्जा लागते. अगदी आपण घरात भांडंभर पाणी तापायला ठेवलं तरी ते काही लगेचच्या लगेच गरम होत नाही. मग एवढे महाप्रचंड समुद्र गरम कसे काय होतात? तर या महाप्रचंड समुद्रांचा पृष्ठभागसुद्धा तेवढाच मोठा असतो. त्यातून ते सूर्याची उष्णता शोषून घेतात. या गरम झालेल्या पाण्याने आर्क्टिक सर्कलमधील बर्फ वितळायला सुरुवात होते.
नासाच्या उपग्रहांकडून जी माहिती मिळते त्यावरून असं दिसतं, की दर वर्षीच्या उन्हाळ्यात आर्क्टिकमधील काही बर्फ वितळतो आणि बर्फाचा प्रदेश कमी होतो. सप्टेंबर येईपर्यंत हा बर्फ कमी कमी होत राहतो. पण हिवाळा आला की हाच बर्फ पुन्हा वाढतो. मात्र १९७९ सालापासून सप्टेंबरमधील बर्फ दार वर्षी कमी कमी आधी अधिकाधिक पातळ होतो आहे. म्हणजेच, महासागराचं तापमान जरी अगदी थोडंसंच वाढलं, तरी त्याचा काही वर्षांमध्ये खूप मोठा परिणाम दिसून येतो.
हिमनद्यांवर देखील जागतिक तापमानवाढीचा परिणाम दिसून येतो. हिमनद्या या खरोखर बर्फाच्या नद्याच असतात. त्या नद्यांसारख्याच प्रवाही - वाहत्या असतात. फक्त त्यांचा वाहण्याचा वेग अत्यंत कमी असतो. मात्र जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्यांच्या वाहण्याचा वेग वाढतो. यातील अनेक हिमनद्या पुढे समुद्राला जाऊन मिळतात. तिथे या नद्यांमधून अक्षरशः मोठमोठे बर्फाचे कडे समुद्रात कोसळतांना दिसतात.
हेही वाचा!
पावसाळ्यात ऊन्हाचा ताप, उन्हाळ्यात पाऊस- हे असं सगळं का झालंय?
समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा आणि जागतिक हवामानबदलाचा काय संबंध आहे?

जसजशा अधिकाधिक प्रमाणात हिमनद्या समुद्रात येऊन वितळतायत तसतशी समुद्राची पातळी वाढते आहे. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही जागतिक तापमानवाढ दर्शवते. मात्र समुद्रात येऊन वितळणारा बर्फ हा काही समुद्राची पातळी वाढण्यामागचं एकमात्र कारण नाही.
समुद्राची पातळी किती वाढलेली आहे?
समुद्रातील पाण्याच्या तापमानात जशी वाढ होते तसं पाणी अक्षरशः प्रसरण पावतं. त्यामुळेदेखील समुद्राची पातळी वाढते. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं आहे, की गेल्या १०० वर्षांत समुद्राच्या पातळीत तब्बल ७ इंचांची वाढ झाली आहे.
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


