पावसाळ्यात ऊन्हाचा ताप, उन्हाळ्यात पाऊस, हे असं का झालंय?

एका रात्रीत हवामानात बदल घडत नाही. हवामान बदल हे हजारो, लाखो वर्षातून घडतात. भूवैज्ञानिकांच्या संशोधनानुसार गेल्या १५० वर्षात हवामान बदलाचा वेग हा त्या आधीच्या हवामान बदलाच्या वेगाहून खूप जास्त आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे हवामानात बदल घडून येतात. 

हवामान बदलाची कारणं

पृथ्वीच्या हवामानावर परिणाम करणारी सर्व ऊर्जा सूर्यापासून तयार होते. सूर्याची ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणात पोहोचपर्यंत ती अंतराळतही जाते. पूथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाद्वारे सूर्याची थोडीच ऊर्जा अडवली जाते. काही ऊर्जा अंतराळात परत जाते तर काही ऊर्जा वातावरणाद्वारे शोषली जाते. सूर्याकडून येणारी ही ऊर्जा सारख्याच तीव्रतेची राहात नाही. काळाप्रमाणे यात बदल होतो. सूर्याच्या या उर्जेत बदल झाला की हवामान बदल होतो.

सूर्याभोवतीची पृथ्वीची कक्षा लंब वर्तुळाकार असते. पण ही कक्षा कायम लंब वर्तुळाकार राहात नाही. कधी कधी ही एकदम गोल होते, त्यामुळे पृथ्वी तिच्या कक्षेत सूर्यापासून समान अंतरावर असते. तर एरवी पृथ्वीची ही कक्षा अधिकच लंबवर्तुळाकार होते. त्यामुळे पृथ्वी तिच्या कक्षेत सूर्याच्या अधिक जवळ किंवा दूर असते. पृथ्वी जेव्हा सूर्याच्या अधिक जवळ असते तेव्हा हवामान अधिक उष्ण होतं. त्याचा ऋतुंवरही परिणाम होतो.

पृथ्वीचा आस किती कललेला आहे, त्याचाही परिणाम म्हणून हवामान बदल होतो. पृथ्वीचा आस हा २३.५ अंशावर कललेला असतो. पण ४१  हजार वर्षात बदल होवून पृथ्वीचा आस कधी  २२. १ अंशावर कललेला असतो तर कधी तो  २४. ५ अंशावर कललेला असतो. शास्त्रज्ञ सांगतात की, जेव्हा पृथ्वीचा आस जास्त कललेला असतो तेव्हा उन्हाळा जास्त तीव्र असतो आणि हिवाळ्यात जास्त थंडी पडते.

Image: un.org

हेही वाचा! 

Image: eartheclipse

समुद्र हा पृथ्वीवरची उष्णता आपल्या पोटात घेतो. पण समुद्राचा पृष्ठभाग खूप तापलेला असल्यास तो पृथ्वीवरची उष्णता जास्त शोषून घेवू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वी जास्त गरम होते.

जगभरातले समुद्र दरवर्षी वातावरणातील एकूण कार्बन डाय ऑक्साइडच्या पाव भाग कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात. पण समुद्राचा पृष्ठभाग जर जास्त तापलेला असेल तर समुद्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेवू शकत नाही. याचा परिणाम म्हणून वातावरणातल्या कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढतं आणि ते हवामान बदलास कारणीभूत ठरतं..

वृक्ष आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. झाडं वातावरणातला कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात. पण वृक्षांची संख्या कमी असेल तर मात्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वाढतो. झाडं तोडल्यामुळे 'अलबिडो' वाढतो. अलबिडो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून सूर्याचा किती उष्मा हा शोषला जातो आणि किती परावर्तित होतो. अलबिडो जास्त असणं म्हणजे सूर्याच्या उष्म्याचं  परावर्तित होण्याचं प्रमाण जास्त असणं. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीचं वातावरण उष्ण होत आहे . लाकूड मिळवण्यासाठी , पाल्म ऑइल तयार करण्यासाठी, रस्ते, धरणं बांधण्यासाठी, तेलाच्या खाणी खोदण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. मानवाच्या या कृतीमुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढत आहे. पृथ्वी पूर्वीच्या तुलनेत जास्त गरम होण्यामागे माणूस करत असलेली वृक्षतोड आहे.

गेल्या दीडशे वर्षात औद्योगिकरणाचा झपाटा वाढला आहे. त्यामुळे कोळसा, पेट्रोल आणि नैसर्गिक वायूंचं ज्वलन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात एक अदृश्य ब्लॅंकेट तयार होतं. हे ब्लॅंकेट सूर्याची उष्णता पकडून ठेवतं आणि त्यामुळे पृथ्वी जास्त गरम होत आहे.

रवंथ करणाऱ्या  प्राण्यांच्या पचनक्रियेमधून मिथेन वायुची निर्मिती होते. त्यांच्या या पचनक्रियेला एंटेरिक फर्मेंटेशन असं म्हणतात.जनावरांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूतून मिथेन हवेत मिसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. जगात आज एक अब्ज पन्नास कोटी रवंथ करणारे प्राणी पचनक्रियेतून तयार होणारा मिथेन वायू उत्सर्जित करत आहे. वातावरणातील मिथेन वायूचं प्रमाण वाढल्याने  त्याचा परिणाम हवामान बदलावर होत आहे.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? 

लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact