
इंग्रजीचा अभ्यास करायला अज्जिबात आवडत नाही कारण ती स्पेलिंग्ज पाठ करत बसायला लागतात.. किती शब्द.. त्याची किती स्पेलिंग्ज… कुठे ‘आय’ वापरायचा, कुठे ‘डबल ई’ करायचा, सगळा गोंधळ नुसता. ‘वॉटर’ चं स्पेलिंग करताना ‘डब्ल्यू ए’ मग ‘चॉकलेट’ चं स्पेलिंग करताना ‘सीएचओ’ का? ‘सीएचए’ का नाही?
आईबाबा इंग्रजीच्या पेपरचा अभ्यास घ्यायला लागले की ही अशी चिडचिड तुमचीही होते का?- तर मग काही गोष्टी लक्षात ठेवा-
१. इंग्रजीच्या पुस्तकातले धडे, कविता नीट वाचणं, त्या वाचताना सतत डोळे आणि मेंदू जागा असणं हे या विषयाच्या अभ्यासासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.
२. डोळे आणि मेंदू जागा असला की सगळी स्पेलिंग्ज नीट वाचली जातात. अनेकदा वाचली की ती वेगळी पाठ करायला लागत नाहीत, पाठ होऊन जातात. हे तुम्ही करुनच बघा.
३. जे शब्द मोठे आहेत त्यांची स्पेलिंग्ज तुकड्या-तुकड्यात पाठ करा, म्हणजे नक्की लक्षात राहातील. बघा ट्राय करुन!
४. शब्द-स्पेलिंग-अर्थ लिहून काढा. लिहून काढलं की मनातल्या मनात वाचा… मग एकदा मोठ्ठ्याने वाचा, असं दोन-तीनदा केलं तरी स्पेलिंग्ज पाठ होऊन जातील.
हेही वाचा!
मी अभ्यासात ॲव्हरेज आहे' असं कोण म्हणतं ..तुम्ही की आणखी कोणी?
५. आईबाबांना किंवा ताईदादाला तुम्हाला शब्द घालायला सांगा आणि तुम्ही त्याची स्पेलिंग्ज तयार करा, ‘ए, ई, आय, ओ, यू’ हे स्वर कुठे कधी कसे वापरायचे हे समजून घ्या, म्हणजे तुमचा अभ्यास सोपा होईल.
६ . ‘ए, ई, आय, ओ, यू’ चा वापर आणि त्यांचा उच्चार यातला फरक नीट समजून घ्या. ‘ऑक्स’ आणि ‘ओरिजिनल’ या दोन शब्दांमध्ये ‘ओ’ आहे पण त्याचा उच्चार दोन्हीकडे वेगळा आहे. ‘युनायटेड’ आणि ‘अंडर’ या दोन शब्दांमध्ये ‘यू’ आहे पण त्याचाही उच्चार दोन्हीकडे वेगळा आहे.
- हे फरक ओळखायला तुम्हाला जमलं की स्पेलिंग्जचं टेन्शन कमी होईल आणि इंग्रजीच्या अभ्यासाची मजा येईल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


