१५० वर्षांपूर्वी नष्ट झालेली महाकाय कासव त्यांच्या मूळ घरी कशी परतली?

Image:newsforkids

गॅलापागोस हे प्रशांत महासागरातील एक बेटांचा समूह आहे. तिथे फ्लोरेना नावाचं बेट आहे. या बेटावर १५० वर्षानंतर महाकाय कासवं फिरताना दिसू लागली आहे. तसेच या कासवांसोबतच या बेटावरचे मूळ प्राणी, पक्षीही बेटावर परतू लागले आहे. ही बातमी जगभर पसरली. कासवांचं फिरणं, प्राणी पक्ष्यांचं बेटावर परतणं यात काय बातमी? असं वाटेल तुम्हाला. खरंतर यात बातमी आहे आणि त्यामागे एक गोष्टही आहे. फ्लोरेना बेट हे महाकाय कासवांचं मूळ घर. पण गॅलापागोस हा बेटांचा समूह समुद्राच्या मध्यभागी आहे. त्यामुळे खलाशांचं थांबण्याचं हे मुख्य ठिकाण. सन १८०० मध्ये गॅलापागोसवर आरामासाठी थांबणारे खलाशी आणि समुद्री चाचे ( लुटारू) येथील कासवांची खाण्यासाठी शिकार करायचे. त्यामुळे कासवांच्या प्रजातीचं खूप मोठं नुकसान झालं.

हेही वाचा!

व्हेरोनिका नावाची एक स्मार्ट गाय: खाज आल्यावर झाडू वापरते!

खलाशी आणि समुद्री चाचे या बेटांवर उंदीर, मांजर, बकऱ्या हे बेटाबाहेरचे प्राणी आणायचे. या प्राण्यांमुळे काही काळातच गॅलापागोसवरील कासवांना नष्ट केलं. असं वाटलं की फ्लोरेना बेटावरील ही कासवांची गोष्ट कायमची संपली. पण तसं झालं नाही. गॅलापागोस नॅशनल पार्क आणि इतर समुहांनी हे बेट आणि या बेटावरचे प्राणी, वनस्पती यांच्या संरक्षणासाठी काम करायला सुरुवात केली. १९९७ ते २००६ या काळात गॅलापागोसची बेटांची बाहेरुन आलेल्या प्राण्यांपासून सुटका करण्यात आली.२०२३ मध्ये फ्लोरेना बेट हे उंदीर, रान मांजर या प्राण्यांपासून मुक्त झाले. त्याचा मोठा परिणाम नंतर पाहावयास मिळाला. यामुळे येथील स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती वाढण्यास सुरुवात झाली. २०० वर्षांपूर्वीचे पक्षी पुन्हा गॅलापागोसच्या बेंटावर दिसू लागले. बाहेरुन आलेले प्राणी निघून गेल्याने फ्लोरेना बेट कासवांना परतण्यासाठी सुरक्षित झाले.

२००८ मध्ये इसाबेला बेटाअर गॅलापागोसवरील फ्लोरेना बेटावर आढळणाऱ्या कासवांसारखे कासवं दिसून आलेत. मग या कासवांचा डीएनए तपासण्यात आली. हे डीएनऐ फ्लोरेना बेटांवरील कासवांशी मिळतीजुळती होती. त्यानंतर शास्त्रज्ञांनी गॅलापागोसमध्ये ६०० कासवं वाढवली. आता २० फेब्रुवारीला १५८ महाकाय कासवांना फ्लोरेना बेटावर आणलं गेलं. या कासवांचं वय ८ ते १३ वर्षं असून त्यांचं वजन १० ते ४० पौंड म्हणजे साडेचार किलो ते १८ किलो इतकं आहे;
या कासवांना फ्लोरेनामधील अशा ठिकाणी सोडले गेले जिथे त्यांना चांगलं वाटेल. या कासवांचं निरिक्षण करण्यासाटी त्यांच्या कवचाखाली एक डिव्हाइस ट्रॅकर बसवलं गेलं. त्या ट्रॅकरद्वारे शास्त्रज्ञ या कासवांवर लक्ष ठेवत आहेत.

Image:newsforkids

महाकाय कासवांमुळे फ्लाॅरेना बेटावर १५० वर्षांपूर्वीचं नैसर्गिक वातावरण पुन्हा तयार होईल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. जसजसे हे कासव मोठे होऊ लागतील तसं वनस्पतींनी वेढलेला भाग स्वच्छ होईल. पाण्याच्या डबक्यांमध्ये चिखलयुक्त भाग तयार व्हायला ही कासवंच मदत करतील. तसेच कासवांमुळे येथील स्थानिक वनस्पतींच्या बिया इतरत्र पसरतील आणि या बेटावर येथील स्थानिक वनस्पती पुन्हा नव्याने बहरतील. विज्ञानाच्या मदतीने फ्लोरेना बेटावरचं १५० वर्षांपूर्वीचा निसर्ग या बेटावर पुन्हा आकार घेत आहे. म्हणून फ्लोरेना बेटावर महाकाय कासवांचं परतणं ही खूप मोठी बातमी झाली आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact.