
Image: i.pinimg
आपल्याला कितीही फिरण्याची हौस असली तरी प्रवास करुन काही काळानं थकवा येतोच. प्रवास नको, आता आराम हवा , असा विचार येतोच. पायी असू देत किंवा विमानात बसून आरामशीर केलेला प्रवासा असू देत, प्रवास हा प्रवासच असतो. त्याने थकायला होतंच. ही झाली आपल्या माणसांची गोष्ट. पण पक्ष्यांचं काय? पक्ष्यांचं जग, जगणं, त्यांच्या सवयी, क्षमता माणसांपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणूनच माणसांना अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी पक्ष्यांसाठी सहज बाब असते. जराही विसावा न घेता एक वर्षापेक्षा जास्त काळ उडणारा पक्षी तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला तर वाटेल असा पक्षी फक्त कल्पनेत असू शकतो, वास्तवात नाही. पण खरंच असा पक्षी आपल्या पृथ्वीवर आहे. त्याला अल्बाट्रोस या नावानं ओळखलं जातं. हा पक्षी समुद्रपक्षी आहे. दक्षिण समुद्र आणि उत्तर पॅसिफिक येथे अल्बाट्रोस आढळतो. अंटार्कटिक खंड, उपोष्णकटिबंधीय पाण्यावर तसेच दक्षिण गोलार्धात अल्बाट्रोस आढळतात. पण अपवाद म्हणून हवाई बेटांवरदेखील अल्बाट्रोसचं अस्तित्त्व आहे.
हेही वाचा!
अल्बाट्रोसचं वैशिष्ट्यं काय?

Image: .unsplash
हेही वाचा!

Image: wallpaperflare
आपल्या वैशिष्ट्यांनी पृथ्वीवरील इतर पक्ष्यांच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या अल्बाट्रोसचा समावेश धोकादायक प्रजातींमध्ये करण्यात आला आहे. मानवामुळे या अल्बाट्रोसचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मासेमारीसाठी मोठाले हुक्स असलेले जाळे वापरले जाते. या जाळ्यात समुद्रावरुन उडणारे हे पक्षी अडकतात. जाळ्यात ओढले जावून समुद्राच्या पाण्यात बुडतात. दर वर्षी १००० अल्बाट्रोस असे जाळ्यात अडकून मरतात. तसेच अनेक अल्बाट्रोस अंड्याच्या अवस्थेत किंवा छोटी पिल्लं असताना मांजर, उंदीर यांच्याकडून शिकार होवून मरतात. समुद्रातीक प्लॅस्टिकयुक्त कचरा खाद्यात येतो आणि मोठे अल्बाट्रोस तेच खाद्य आपल्या पिल्लांना देतात. हानीकारक प्लॅस्टिक पोटात जावून अल्बाट्रोस मरतात.
अल्बाट्रोससारखे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे आपल्या पृथ्वीचं वैभव आहे. हे पक्षी जगायला हवेत. फक्त त्यांच्या सुरक्षेसाठी आता माणसाने पाऊल उचलण्याची गरज येवून ठेपली आहे. माणूस करेल का या अल्बाट्रोसची मदत
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact