
Image: freepik
आई जेव्हा स्वयंपाक करते, तेव्हा दोन गोष्टींचा विचार करते. एक म्हणजे आपण जे करतो आहोत, ते पौष्टिक आहे ना? दुसरे म्हणजे, ते घरात सगळ्यांना आवडेल ना? पौष्टिकता आणि आवड निवड यांचा मेळ घालून आई रोजचा स्वयंपाक करते. पण आईनं आपल्याला न आवडणारी भाजी केली आणि ती कितीही पौष्टिक असली तरी आपली खाण्याची इच्छा होत नाही. मग काय होतं? आई वाढते आणि आपण उष्टं टाकतो. तर अनेकांना गरजेपेक्षा ताटात जास्त वाढून घेण्याची आणि पोट भरल्यानंतर बाकीचं उष्टं टाकण्याची सवय असते. हे असं पानात अन्न उष्टं टाकल्यावर आई रागावते. आपण गप्पं बोलणी खातो आणि हात धुवून आपल्या कामाला लागतो.
हेही वाचा!
आपण जेवताना जेव्हा अन्न उष्टं टाकतो तेव्हा आपण हे अन्न तयार होण्यासाठी वापरली गेलेली ऊर्जा, पाणी हे सर्व वाया घालवतो. वाया गेलेलं अन्नं जेव्हा सडतं, तेव्हा त्यातून मिथेन नावाचा ग्रीन हाउस गॅस बाहेर पडतो. हा मिथेन वायू कार्बन डायऑक्साइडपेक्षाही शक्तिमान असतो. 7 ते 8 टक्के ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जनास मनुष्य आणि त्याच्या वाईट सवयी कारणीभूत आहेत. पण आपण जर ताटातलं अन्न वाया घालवण्याची सवय बंद केली तर ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावू शकतो.

Image: freepik
अन्न वाया जावू नये म्हणून काय कराल?
अन्न वाया जाणार नाही, ना आपल्या ताटात, ना आपल्या घरात याकडे लक्ष देण्याची छोटीशी जबाबदारी उचलायची का आपण?
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact