वातावरणातला त्रासदायक ग्रीन हाऊस इफेक्ट कसा वाढला ?

पृथ्वी, पृथ्वीवरचे जीव, वनस्पती टिकवून ठेवण्यात ग्रीन हाऊस गॅसेसची भूमिका खूप महत्वाची आहे. ग्रीन हाऊस इफेक्टमुळेच सूर्याच्या प्रकाशातून शोषून घेतलेली ऊर्जा आणि परावर्तित ऊर्जा यांच्यात समतोल राखला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून हा समतोल बिघडतो आहे. पृथ्वीच्या वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतं आहे. या गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीकडून परावर्तित होणारी सूर्याची ऊर्जा अंतराळात न जाता ग्रीन हाउस वायूंकडून शोषली जाते आणि पुन्हा पृथ्वीकडे पाठवली जाते. त्याचाच परिणाम म्हणून पृथ्वी आता जास्त तापू लागली आहे. पृथ्वीच्या अशा जास्त तापण्यालाच ग्लोबल वाॅर्मिंग असं म्हणतात.

ग्लोबल वाॅर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरल्या ध्रुवीय प्रदेशातला बर्फ वेगानं वितळू लागला आहे. या बर्फात पृथ्वीचं ७० ते ७५ टक्के शुध्द पिण्याचं पाणी असतं, ते असं बर्फ वितळत जाण्यामुळे आणि ते पाणी समुद्रात जात असल्याने समुद्राची पातळी वाढत आहे. वाढत जाणाऱ्या समुद्र पातळीमुळे मनुष्यजीवन धोक्यात आलं आहे. वातावरणातला ग्रीन हाउसचा नकारत्मक परिणाम वाढल्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. ग्रीन हाऊसचा वाढता इफेक्ट आणि हवामान बदलाचा असा थेट संबंध आहे.

हेही वाचा!

ग्रीन हाऊस इफेक्ट वाढला कारण..

वातावरणातला ग्रीन हाऊस वायू वाढण्यास मानवाची कृती जबाबदार असल्याचंही संशोधनातून सिध्द झालं आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कार्बन डाय ऑक्साइड हा ग्रीन हाऊस वायू वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. जीवाश्म इंधनाचं ज्वलन, गाड्या, ट्रक, रेल्वे गाड्या आणि विमान वाहतुकीने होणाऱ्या प्रदुषणातून कार्बन डाय ऑक्साइड वायू वाढतो आहे. गुरांचा चारा पिकवण्याची पध्दत, त्याचा त्यांच्या पचनावर होणारा परिणाम, कचरा जमिनीत गाडण्याची पध्दत, कोळशाच्या खाणी खणणं, नैसर्गिक गॅस निर्मिती यातून कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन या वायुंचं वातावरणातलं प्रमाण वाढत आहे. एरोसेल्सद्वारे रेफ्रिजरेशन आणि कुलिंग उत्पादनांच्या निर्मितीमुळे फ्लोरोफ्ल्यूओकार्बन्स, हायड्रोक्लोरोफ्ल्यूओरोकार्बन्स आणि हायड्रोफ्ल्यूओरोकार्बन्स या फ्लुओरिनेटेड गॅसेसचं प्रमाण वाढलं . त्याचा परिणाम हवामान बदलावर झाला. 

Image: science.org.au

Image : news.mit.edu

पृथ्वीवरच्या एकूण कार्बन डाय ऑक्साइडचा पाव भाग हा समुद्राकडून शोषला जातो. पण वातावरणातला कार्बन डाय ऑक्साइड वाढल्यानं समुद्राच्या पाण्यातल्या कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे समुद्राची पृथ्वीवरची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान वाढतंय. समुद्राच्या पाण्याचं तापमान वाटण्याचा परिणाम समुद्रातील जीवांवर होत आहे. तसेच वातावरणातल्या वाढणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडचा परिणाम वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवरही होतो आहे. 

ग्रीन हाऊस इफेक्टचा सकारात्मक भाग जगानं अनुभवला . पण नैसर्गिक आणि मानवर्निर्मित कारणांमुळे पृथ्वीवरचा  हा  ग्रीन हाऊस  इफेक्ट वाढून त्याचा परिणाम  पृथ्वीच्या वातावरणावर होत आहे. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली  आहे. हा धोका कमी करायचा असल्यास  ग्रीन हाउस इफेक्ट कमी होणं गरजेचं  आहे. त्यासाठी आता माणसालाच गांभिर्यानं पावलं उचलावी लागणार आहे. माणूस त्यासाठी काय करू शकतो? 

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact