आपल्याला राग का येतो? राग आल्यानंतर काय घडतं?

आज काय 'कराल'?

-विनय र.र.

Image: freepik

राग ही साधी गोष्ट नाही. तो आल्यानंतर आपल्या शरीर मनात खूप काही घडतं? आपल्या रागाचा अभ्यास करणं सहज शक्य आहे. तो कसा करायचा?
तुम्ही कोणाला कधी रागावलेलं बघितलं आहे? राग आल्यावर त्यांचा चेहरा कसा होतो? आवाजात बदल होतो का? हातापायांच्या हालचाली कशा होतात? ती व्यक्ती तुमच्यावर रागावली असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीची अशी निरीक्षणे करता येतील? तुम्हाला कधी राग आला आहे का? तेव्हा तुमच्या शरीरात काय बदल होतात? अंग तापते? अंगात रक्त सळसळते? काय काय होते ते आठवा. लिहून काढा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींंशी तुम्ही तुम्हाला आलेल्या रागाबद्दल बोलति की नाही? आपण आपल्याला आलेल्या रागाचा शोध घेऊ. कशाचाही शोध घ्ययचा म्हंटले की आपण आपल्याशी प्रामाणिक असायला लागणार. तर रागाच्या शोधाचे हे प्रश्न -

हेही वाचा!

झाकलेले पदार्थ वासाने ओळखा!

मला किती राग येत आहे? म्हणजे आपल्याला आलेला राग महाप्रचंड आहे की खूप आहे की बराच आहे की थोडासा आहे? ते कसे ठरवायचे? त्याचा विचार करा. रागाची भावनिक तीव्रता मोजण्याचं मोजमाप काय आहे? हे काम थोडं अवघड वाटेल पण करून तर बघू.
माझा राग किती काळ टिकतो किंवा टिकला ? हा तुलनेने सोपा प्रश्न आहे. कालावधी किती मिनिटे पासून किती दिवस असा लिहीता येईल.
मी माझा राग कसा व्यक्त केला किंवा करतो/करते? राग व्यक्त करताना सहजपणे सांगता आला की आतल्या आत घुसमटत राहिला?
मला राग येण्यासाठी किती लहान किंवा मोठे कारण पुरते? या प्रश्नाचे उत्तर मिळवताना आपण किती संवेदनशील आहोत हे तुमच्या लक्षात येईल.
माझा राग माझ्या विचारांवर किती परिणाम करतो? राग आल्यावर मला बाकी कसला विचार करता येतो का?
माझा राग माझ्या शारीरिक अवस्थेवर किती परिणाम करतो?
मी माझा राग किती नियंत्रित करू शकतो / शकते? आपला राग आटोक्यात आणण्याची नियंत्रण क्षमता किती आहे?
माझा राग इतरांशी संवादावर किती परिणाम करतो? यावरून आपल्या रागाचा सामाजिक प्रभाव मोजता येईल.
माझा राग माझ्या दैनंदिन कामावर किती परिणाम करतो? रांगा मुळे तुमच्या कार्यक्षमतेवर किती प्रभाव दिसून येईल.
मला राग किती वारंवार येतो? दिवसात किती वेळा? महिन्यात?
आपल्याला येणाऱ्या रागाचा अभ्यास करायला सांगितल्याबद्दल तुम्ही रागावला तर नाही ना?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact