घरच्या घरी बनवा इंद्रधनुष्यासारखे रंग दिसणारी लॅम्प शेड

images : google

इंद्रधनुष्याची लॅम्पशेड बनवण्यासाठी जे साहित्य लागतं त्यात अर्थातच सगळ्यात आधी इंद्रधनुष्यातील सगळ्या रंगांचे मार्कर्स पाहिजेत. किंवा हायलायटर पेन पण चालेल. अगदीच काही नाही तर स्केच पेन पण चालेल. पण स्केच पेनचे रंग फार फिकट दिसतात. त्यामुळे शक्यतो मार्कर किंवा हायलायटर मिळवा. दुसरं म्हणजे रुंद सेलोटेपचं बंडल पाहिजे. आपल्याला त्यातली सेलोटेप पण घ्यायची आहे आणि उरलेलं बंडलपण पाहिजे आहे. किंवा तुम्ही सेलोटेपची पूर्ण गुंडाळी असते त्या मापाची कार्डबोर्डची दुसरी एखादी गुंडाळीसुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे तीही नसेल तर सरळ कार्डशीटची पट्टी कापून घ्यायची. अशा दोन पट्ट्या एकमेकांना चिकटवून जरा जाड कागद तयार होतो. त्याची पोकळ गुंडाळी करायची.

हेही वाचा… 

स्वत: बालमजूर म्हणून काम केलेल्या ओमने शेकडो मुलांना बालमजूर होण्यापासून वाचवले., ते कसे?

आपल्याकडे एक तीन ते चार इंच व्यासाची कार्डशीटची गुंडाळी तयार झाली की सगळ्यात आधी रुंद सेलोटेपचे दोन तुकडे काढून घ्यायचे. ते तुकडे त्याच सेलोटेपची बाजू बंद होईल असे चिकटवायचे. तुम्हाला दोन किंवा तीन तुकडे लागू शकतात. ते झालं, की त्या पारदर्शक सेलोटेपवर ता-ना-पि-हि-नि-पा-जा या क्रमाने सरळ रेषेत रंग द्यायचे. एवढं केलं की आपली लॅम्पशेड तयार!

आता ही लॅम्पशेड घरातल्या कुठल्याही बल्बवर धरा आणि बघा. भिंतीवर रंगांचं सुंदर इंद्रधनुष्य दिसेल. सेलोटेपवर मार्करने चित्र काढून ते दिव्यावर धरलं, की ते भिंतीवर दिसतं हे एकदा लक्षात आल्यावर तुम्ही त्यात वेगवेगळे प्रयोग करून बघू शकता. त्यावर तुम्ही निळ्या चांदण्या काढून बघा. किंवा फक्त पांढऱ्या चांदण्या शिल्लक ठेऊन उरलेलं आकाश निळं किंवा काळं करून बघा. फूल काढा. फुलपाखरू काढा. हार्ट काढा. किंवा नुसत्या रंगीत रेषा काढा. आणि तुमच्या लॅम्पशेडचा प्रकाश कसा पडतोय ते नक्की कळवा.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact