जंगलातील प्राण्यांच्या सवयी कोणत्या, धोका कसला हे आता AI सांगणार!

- शिवान दर्डा

गेम्सपासून ते व्यायामापर्यंत, तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि आता तर त्याचा वापर आपली पृथ्वी वाचवण्यासाठीही करता येऊ शकतो. पृथ्वीवरची जीवसृष्टी सांभाळणं आणि त्यातील विविध घटकांचा आपापसातला तोल सांभाळणं यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय याचा चांगला उपयोग करता येतो आहे. तो कसा ते आपण बघूया.

उपग्रहातून टिपलेली छायाचित्रं

image : European Space Agency

पृथ्वीभोवती सोडलेले उपग्रह पृथ्वीवर असलेल्या जंगलाच्या आच्छादनाचे फोटो काढत असतात. मात्र या फोटोत दिसणाऱ्या बदलांचा अर्थ लावण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. यामुळे जंगलांचा विनाश होणं किंवा जंगलांवर शहरी वस्तीचं अतिक्रमण होणं याला आळा बसू शकतो. या माहितीमुळे कुठल्या भागात वनसंरक्षण गरजेचं आहे हे लक्षात येऊ शकतं, त्याचप्रमाणे केलेल्या वनसंरक्षणाचा किती उपयोग होतो आहे हेही तपासता येऊ शकतं.

 

 

हे वाचा!

हवामान बदलामुळे माणसं आणि पशुपक्षांचं काय होईल ?

वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

वन्यजीवांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी कॅमेरा असलेले ड्रोन्स आणि इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या यंत्रणा आता वापरल्या जातात. यात एखाद्या भागातल्या प्रजातींमधल्या प्राण्यांची संख्या आणि त्या प्राण्यांच्या सवयी या दोन्हीचा अभ्यास करता येऊ शकतो. यामुळे अभ्यासकांना वन्यजीवांच्या वागणुकीचा, सवयींचा आणि गरजांचा अधिक चांगला अभ्यास करता येऊ शकतो. शिवाय एखाद्या प्रजातीला कशापासून धोका आहे हेही जास्त चांगलं समजू शकतं.

image : AI World School

 

हे वाचा!

निसर्ग बदलतोय हे तुमच्या लक्षात आलंय का?

हवामान बदलांचे अंदाज

हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं यात काही नवीन नाही. मात्र हा अंदाज अधिक अचूक बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं हे नवीन आहे. हवामानाचे पॅटर्न्स, तापमान आणि इतर पर्यावरणातील घटक यांची माहिती गोळा करून हे काम केलं जातं.

थोडक्यात सांगायचं तर… 

वातावरणात होणाऱ्या नाट्यमय बदलांचा विचार करता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगातील जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact