आईच्या-ताईच्या वापरात नसलेल्या बांगड्यांपासून पेनस्टॅण्ड बनवा!

image : inscrutables

परीक्षा जरी असेल, तरी आपण काही पूर्ण वेळ अभ्यास करत नाही. अभ्यास करून झाल्यावर जो वेळ उरतो त्यात काय करायचं हा प्रश्न तर आपल्याला रोज पडतोच. पण ऐन परीक्षेच्या काळात बाहेर जाऊन नवीन साहित्य आणून काही आपण करू शकत नाही. त्यामुळे आज घरातल्या घरात करण्यासारखी एक भारी वस्तू करूया.  आज तुमच्या, आईच्या, आजीच्या, बहिणीच्या जुन्या, त्यांना न होणाऱ्या किंवा त्यांना नको असलेल्या बांगड्यांपासून पेन स्टॅन्ड बनवूया.

 

 

 

हेही वाचा…

एक रुपयाच्या नाण्यावर पाण्याचे किती थेंब राहू शकतात?

image : facebook

 

साहित्य: 

सर्व आकाराच्या टाकाऊ, जुन्या, नको असलेल्या प्लस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या, रंग, डिंक 

कृती: 

१) सगळ्या बांगड्या एकत्र करा. 

२) त्यातल्या डिझायनर बांगड्या वेगळ्या करा. 

३) प्लेन बांगड्या वेगळ्या करा. 

४) आता प्लेन बांगड्या जर तुम्हाला रंगवायच्या असतील तर रंगवून घ्या. 

५) सगळ्या रंगवलेल्या बांगड्या वाळू द्या. 

६) आता डिझाईन बनवू या. 

७) डिझाइनर बांगड्या, प्लेन बांगड्या आणि तुम्ही रंगवलेल्या बांगड्या, तुम्हाला पाहिजे त्या क्रमाने एकवार एक ठेवा. 

८) एकदा का तुमचं डिझाईन तयार झालं की प्रत्येक बांगडी एकमेकांना चिकटवून घ्या. झाला तुमचा पेन स्टॅन्ड   

९) हा पेनस्टॅण्ड शक्यतो काचेच्या बांगड्यांचा करू नका. कारण चुकूनही तो पडला तर फुटेल.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact