परकीय प्राणी आणि वनस्पती यांच्याविरुध्द युध्द सुरु आहे!

-शिवान दर्डा

भारताच्या विशाल भूप्रदेशावर एक वैशिष्ठ्यपूर्ण लढाई सध्या सुरु आहे. त्यातली आश्चर्याची बाब अशी की ही लढाई ही काही वनस्पती आणि प्राण्यांविरुद्ध सुरु आहे. हे प्राणी आणि वनस्पती एरवी निरुपद्रवी असले, तरी ते इथल्या जैवविविधतेचा नाजूक समतोल बिघडवत आहेत.

image : stop aquatic hitchhikers

अतिशय सुरेख निळी जांभळी फुलं येणारी जलकुंभी किंवा वॉटर हायसिंथ नावाची वनस्पती कितीही निरुपद्रवी दिसत असली तरी तिची प्रचंड प्रमाणात वाढ होते. जलकुंभी ही वनस्पती एका वर्षात प्रति चौरस मीटर २००० वनस्पती इतक्या वेगाने वाढू शकते. ही आक्रमक जलवनस्पती आत्ताच १०,००० हेक्टर्स पाण्यावर पसरलेली आहे. यामुळे तलाव, नद्या आणि कालव्यांच्या अक्षरशः श्वास गुदमरतो आहे. त्यामुळे मासेमारी आणि जलवाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

image : wikipedia

याशिवाय अमेरिकन बुलफ्रॉग नावाचा उभयचर आता भारतात स्थिरावला आहे. एक अमेरिकन बुलफ्रॉग वर्षाला १००० स्थानिक भक्ष्य फस्त करतो. त्यामुळे येथील स्थानिक प्रजातीतीतल बेडकांच्या संख्येवर परिणाम होतो. या शत्रूमुळे भारतातील पाणथळ जागांमधील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. 

image : researchgate

पाण्याखालील परिस्थिती याहून अधिक गंभीर आहे. कारण पाण्याखालील जगात आफ्रिकन कॅट फिश चा शिरकाव झाला आहे. असा अंदाज आहे की काही ठिकाणी एकूण माशांच्या संख्येपैकी ९० टक्के मासे हे आफ्रिकन कॅट फिश आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्या स्थानिक प्रजातींवर अवलंबून असलेला मासेमारी व्यवसायदेखील धोक्यात आला आहे.

हेही वाचा!

द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स काॅम्पिटीशन’. ही कुठली अजब स्पर्धा?

image : indiamart

आणि आपण जर जमिनीच्या वर बघितलं तर आल्याला दिसतं की अत्यंत चिवट असलेल्या घाणेरी किंवा टणटणीच्या झुडुपांनी भारतीय जंगलांपैकी १,६०,००० चौरस किलोमीटर्स एवढा प्रचंड भूप्रदेश व्यापला आहे. या वनस्पतीच्या बेसुमार वाढीमुळे स्थानिक प्राणी आणि वनस्पतींमधील शांततापूर्ण सहवासाला तडे जातात.

image : wikipedia

विलायती शमीचं झाड आपल्याकडे आणतांना त्यामागचा हेतू चांगलाच होता. मात्र आज या वनस्पतीने ३८,००० चौरस किलोमीटर्सहुन अधिक भारतीय भूभाग व्यापला आहे. हा भूभाग जवळजवळ तैवान या संपूर्ण देशाइतका मोठा आहे. या झाडामुळे जमीन नापीक होणं आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढणं यासारख्या समस्या निर्माण होतात.

मात्र आता भारताने या परकीय प्रजातींच्या आक्रमणाविरोधात धाडसी आघाडी उघडली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून निसर्ग सैनिकांचं सैन्य या प्रजातींच्या निर्मूलनाची मोहीम राबवत आहे. जनजागृती अभियानामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते आहे. भारताने आपली विपुल जैविविविधता टिकवून ठेवण्यासाठीची लढाई सुरु ठेवली आहे. त्यामुळे त्या जैवविविधतेतील समतोल हळू हळू परत येईल अशी आशा वाटते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact