गुडघा छातीला लावा थकवा घालवा! व्यायामाने खरंच थकवा जातो का?

Image: yogaclassplan

काय, मजा येतेय का व्यायाम करायला? काय सांगता तुमचा प्राॅब्लेम वेगळा आहे. शाळा  सुरु झाली. क्लासेस सुरु झाले. त्यामुळे तासनतास एका जागी बसून अभ्यास करावा लागतोय ना. एका जागी खूप वेळ बसायचं म्हटलं की त्या विचारानेच आपल्याला टेन्शन येतं. मग थोडा वेळ होत नाही की शरीराची चूळबूळ सुरु होते. दोन तीन तास मग असा बसून अभ्यास केला की इतका थकवा येतो की आता पुढे काहीच करावंसं वाटत नाही. पाठ दुखायला लागते. अभ्यास तर काही संपलेला नसतो, थोडा वेळानं पुन्हा बसायचं असतं अभ्यासाला. पुन्हा बसून उत्साहानं अभ्यास करायचा असेल तर मग पाठीला आराम द्यायला हवा. आता हा आराम देण्यासाठी एक सोपा व्यायाम करायला हवा. व्यायाम आपल्या शरीराला मजबूत करण्यासोबतच आपल्या शरीराला आराम देण्याचं कामही करतो.

तसंही तुम्हाला झोपायला, लोळायला, झोपून टाइमपास करायला फार आवडतं, हे मला माहीत आहे. त्यामुळे आता अधूनमधून काही झोपून करायचे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे.

 असाच एक हटके व्यायाम आहे, ‘नी टू चेस्ट स्ट्रेचेस’ एक्सरसाइज.

हेही वाचा!

अर्थातच आपला गुडघा छातीला लावण्याचा स्ट्रेचिंग एक्सरसाइज. हा व्यायाम आपल्याला उभ्यानंही करता येतो, पण नीट केला नाही, तर त्यात तोल जाण्याचा धोका असतो. त्यामुळे आधी मस्तपैकी आपण झोपून हा व्यायाम करू.

छातीला गुडघा कसा लावाल?

१. नेहमीप्रमाणे एखादी चटई किंवा मॅट जमिनीवर अंथरा. त्यावर पाठ टेकून झोपा.

२. आता आपला उजवा पाय वर गुडघ्यातून दुमडून वर उचला आणि दोन्ही हातांनी तो छातीवर दाबा.

३. आपल्या पोटाचे स्नायू टाइट ठेवा आणि आपल्या पाठीचा मणका जमिनीला दाबून धरा.

४. आपला गुडघा छातीवर दाबलेल्या स्थितीत सुमारे पाच सेकंद राहा.

५. परत मूळ स्थितीत या.

६. आता डाव्या पायानं हीच कृती परत करा.

७. प्रत्येक पायानं ही कृती दहा-दहा वेळा करा.

Image: physio-pedia


नी टू चेस्ट स्ट्रेचेसचा फायदा काय?

१. यामुळे दुहेरी फायदा होईल. पोटाचा आणि पाठीचाही व्यायाम यामुळे होईल.

२. विशेषत: लोअर बॅकसाठी हा व्यायाम खूपच उपयुक्त आहे.

३. शरीराची लवचिकता वाढेल.

४. शरीरातील स्टिफनेस कमी होईल.

५. जॉइंटमधील फ्लेक्जिबिलिटी वाढेल.

तुम्ही खूप दमला असाल, दिवसभर एकाच जागी बसून अवडघला असाल, तर हा व्यायाम तुम्हाला एकदम रिलॅक्स करेल. बघा करून आणि सांगा मला, एकदम भारी वाटतं की नाही ते..

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact