
जाळं करणारे कोळी तुम्हाला माहिती असतीलच. घरात तुम्ही ते बघितलेही असतील. पण तुम्ही जमिनीत बीळ करुन राहणारे कोळी पाहिले आहेत का? असे कोळी आहेत. कोळ्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे जमिनीत बीळ करुन राहणारे कोळी. या कोळ्याला ट्रॅपडोर स्पायडर म्हणजे दारकरी कोळी असं म्हणतात. हे ट्रॅपडोअ र स्पायडर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाच्या शेंडा पार्क आणि पुईखडीची टेकडीवरच्या माळरानावर हे कोळी आढळले. या कोळ्याच्या प्रजातीचा तेथील अभ्यासकांनी निरिक्षण करुन अभ्यास केला आणि या कोळ्याबद्दलची, हे कोळी कसे राहतात, कसे शिकार करतात याची माहितीही दिली. या प्रजातीला 'टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिस' असं नाव देण्यात आलं आहे.
हेही वाचा!
हनीइटर्स पक्ष्यांना लावावा लागला गाणं शिकण्याचा क्लास!
ट्रॅपडोअर कोळी कसे असतात?
- हे कोळी जमिनीत केवळ बीळ करतात असं नाही तर बिळाला दारही करतात. हे दार फक्त दार नसून ते खाद्य पकडण्याचा सापळाच असतं. यावरुनच या कोळ्याला ट्रॅपडोअर स्पायडर म्हणजे दारकरी कोळी असं म्हटलं जातं.
- बिळाचा दरवाजा हा वेगळा दिसतंच नाही. आजूबाजूच्या जमिनीसारखाच दिसतो. त्यामुळे किटकांना तो ओळखता येत नाही. या बिळात हे कोळी जवळजवळ संपूर्ण आयुष्यभर काढतात.
- हे बीळ साधारणत: १०० सेंमी किंवा त्यापेक्षाही जास्त त्याची लांबी असते. रुंदीच्या कोळ्याचा आकाराप्रमाणे असते. कोळी लहान असताना हे बीळ तयार करतो आणि त्यात राहातो. कोळी जसजसा मोठा होतो तशी त्या बिळाची रुंदीही वाढते. बिळात व्यवस्थित हालचाल करता येईल एवढी जागा कोळी ठेवतात.

- ट्रॅपडोअर कोळ्याला अन्नासाठी भटकावं लागत नाही. आयतं बिळात बसून तो त्याचं खाद्य मिळवतो. त्यासाठी बिळाचा दरवाजा त्याची मदत करतं. या दरवाजाला हे कोळी सिल्कसारखे धागे जोडतात. हे धागेच सेन्सर्सचं काम करतात. हे सेन्सर्सस इतके तीव्र असतात की बिळाच्या दरवाजावरुन किंवा त्याच्या जवळून जरी किडा गेला की हे सेन्सर्सस मुळे बिळात व्हायब्रेशन होतं. आणि ॲलर्ट मोडवर बसलेल्या बिळातल्या कोळ्याला त्याची माहिती मिळते. कोळी दरवाजा उघडतो आणि झपकन झडप घालून भक्ष्य पकडतो आणि भक्ष्याला बिळात घेऊन जातो. अशा प्रकारे हे कोळी म्हणजे जबरदस्त शिकारीच आहेत.
- ट्रॅपडोअर कोळी ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका आणि भारतातही काही ठिकाणी आढळतो. या प्रजातीची मादी कोळी नर कोळ्याच्या तुलनेत जास्त जगते. मादी कोळी ४३ वर्षांपर्यंत जगतात असं अभ्यासक सांगतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


