आई आजोबांना सारख्या सूचना का देते? छोट्याशा जेडेनला पडला मोठा प्रश्न!

Image: .freepik

सिंगापूरमधल्या आपल्या मित्राची- जेडेनची आणि त्याच्या आजोबांची ही गोष्ट.जेडेनच्या आईचे बाबा म्हणजे त्याचे आजोबा त्यांच्या घरी राहायला येतात. जेडेन ६ वर्षांचा आहे. जेडेनचे आई-बाबा दोघंही ऑफिसला जातात. त्याची आई तर इतकं काम करत असते की बस्स! अगदी दिवसंरात्र म्हणा ना! जेडेनचे आई-बाबा इतके वर्कहोलिक आहेत की, त्यांना जेडेनला द्यायला वेळच नाही.

जेडेनची आई   जेडेनचा  अभ्यास, स्वच्छतेच्या सवयींबद्दल फार जागरूक आहे . त्यात आता तिचे बाबा गावाकडून घरी आलेत. जेडेनला त्याच्याशी लहान मुलासारखं खेळणारे, त्याला खाऊ आणणारे हे प्रेमळ आजोबा खूप खूप आवडलेत. त्याला त्यांच्याशी खूप गप्पा माराव्या, खेळावं, आईच्या लहानपणच्या गोष्टी ऐकाव्यात असं खूप वाटतं. पण जेडेनच्या आजोबांचं हातानं खाणं आणि हायजीन याची त्याच्या आईला जाम काळजी वाटते. जेडेन आजारी पडला तर?

हेही वाचा 

जेडेनशी खेळताना आजोबांना त्यांच्या मुलीचं म्हणजेच जेडेनच्या आईचं लहानपण आठवत असतं. ती कशी आईस्क्रीम खायची, हट्ट करायची, कशी मस्ती करायची वगैरे. त्यांना काळजी अशी वाटते की, लहानपणी इतकी छान समरसून जगणारी ही मुलगी आता इतकी गंभीर आणि भावनाहीन का झाली? आणि जेडेनच्या आईला काळजी वाटते की, आजोबांच्या म्हणजे पाच्या संगतीत राहून मुलगा मोठ्यांदा बोलायला लागला तर... खेळत, टीव्ही पाहत बसला तर... जेडेनचे बाबा मात्र कूल असतात. आई आजोबांना सांगते, हेल्दी फूड खा.

जेडेनला वाईट वाटतं, आई आपल्या आजोबांना इतक्या सूचना का करते? त्यांना कसं वाटत असेल?

जेडेन आणि त्याच्या आजोबांची दोस्ती, प्रेम, त्यांचं घट्ट नातं बघण्यासारखं आहे. जेडेनची आई पूर्ण कुटुंबाचं महत्व, मायेच्या माणसांचं सानिध्य मुलांसाठी किती गरजेचं आहे, हे जाणते का, हे 'पा' या शॉर्ट फिल्ममध्ये पाहणं गरजेचं आहे.

लघुपट- पा

कुठं पाहाल? - http://www.viddsee.com/mobile #shortfilm

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact