संकटात सापडलेल्या बाबांना मदत करण्याऱ्या एका मुलीची गोष्ट!

Image: freepik

पंजाबमधील एका गावातली ही गोष्ट! हे गाव तसं छोटंच अहे. इथं छोट्याशा घरात दिनू हे शेतकरी काका व त्यांची दोन छोटी मुलं राहत असतात. मुलगी थोडीशी मोठी म्हणजेच शाळेत जायच्या वयाची असते तर तिच्याहून छोटा तिचा भाऊ. या मुलांना आई नसल्यामुळं त्यांची आईही बाबाच असतो आणि बाबाही बाबाच! या बाबाची थोडीशी शेती असते. त्या शेतीवरच त्यांची गुजराण होत असते. छोटे शेतकरी असतात ना, ते खूप गरीब असतात. त्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून म्हणजे जिरायती असते. पाऊस कमी पडला तरी त्यांचं नुकसान होतं आणि प्रमाणाबाहेर जास्त पडला तरीही! … तर या गोष्टीतला बाबा असाच गरीब शेतकरी आहे. हा बाबा रोज रात्री चुलीवर गरम रोटी करतो आणि त्याबरोबर चटणी असली तर असली नाही तर नाही. नुसती भाकरीच! ‘मला भूक नाही’ असं म्हणून तो एक-दोन रोट्या मुलांना खाऊ घालतो, उरलेलं पीठ दुसऱ्या दिवशीच्या रोट्यांसाठी राखून ठेवतो. नाहीतर त्याची मुलं उपाशी राहतील ना! … पण त्याची मुलगी खूप समजूतदार असते. तिला माहीत असतं की, बाबाही उपाशी आहे, त्याला भूक लागली आहे. ती आपल्यातला घास बाबाला भरवत असते. या तिघांचं एकमेकांवरचं प्रेम हे इतकं घट्ट असतं.

हेही वाचा!

बाबाला वेगळीच काळजी असते, मुलीला शाळेत कसं पाठवायचं? तिच्याकडं ना वह्या-पुस्तकं, ना दप्तर, गणवेशही नाही. ती शिकणार कशी? तिचं आता शाळेत जायचं वय आहे. ‘संध्याकाळी काय खायचं मुलांना काय खाऊ घालायचं?’ हा प्रश्न त्याला रोज सकाळी पडतो. तो हताश होतो आणि आपल्या मित्राला हे सगळं सांगतो. मित्र त्याला पैसे आणून देतो आणि एका कागदावर त्याला अंगठा द्यायला सांगतो. कारण त्याला वाचताच येत नसतं, तर तो सही कुठून करणार? पुढं ती मुलगी शाळेत जाते का? हे कुटुंब कुठल्या संकटात सापडतं का, त्यातून बाहेर पडायला मुलगी कशी मदत करते? हे सगळं आपल्याला ‘सफर’ या लघुपटात पाहायला मिळतं

हा लघुपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या फिल्ममधल्या मुलीला बाबानं झाडाचा तोडून आणलेला पेरू खातानाही पिझ्झा खाल्ल्यासारखा आनंद होतो. बाबांची आणि मुलांची एक साधी पण वेगळी वाटणारी गोष्ट आपल्याला खूप काही सांगू पाहाते. बोलू पाहाते. दु:खाकडून आनंदी जगण्याकडे होणाऱ्या त्यांच्या या सफरमध्ये आपणही त्यांचे सहप्रवासी होतो. हीच तर या लघुपटाची गंमत आहे.  हे वाचल्यानंतर तुम्हालाही हा लघुपट पाहाण्याची इच्छा झाली ना? स्टार्स फिल्म प्रॉडक्शनची ही शॉर्ट फिल्म आहे. ती यूट्यूबवर पाहायला मिळेल.

लघुपटः सफर हार से जीत का सफर 

निर्माताः स्टार्स फिल्म अँड व्हिडिओ

https://www.youtube.com/watch?v=lTQoMR2IZHo

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact