चाॅकलेट द्या वस्तू घ्या! चाॅकलेटच्या चलनाने व्हायचे मोठे मोठे व्यवहार!

Image: thedailymeal

चाॅकलेट म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं ना! किती वेगवेगळ्या प्रकारची चाॅकलेट्स मिळतात. सर्वच चाॅकलेटस खावीशी वाटतात. एका चाॅकलेटच्या बदल्यात घरातली मोठी माणसं आपल्याकडून कामही करुन घेताता आणि आपण काही छान केलं की बक्षीस म्हणून चाॅकलेट देतात. ही चाॅकलेटची देवाणघेवाण आपली सतत सुरुच असते. पण हेच चाॅकलेट पूर्वी चलन म्हणून वापरले जायचे. चाॅकलेटच्या बदल्यात माणसं जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायचे, हे सांगितलं तर विश्वास बसेल का तुम्हाला? पण हे खरं आहे.

गोष्ट चाॅकलेटच्या चलनाची

चाॅकलेटचा इतिहास खूप जुना. हजारोवर्षांपूर्वीचा. ख्रिस्तपूर्व १९०० मधला. मेसोमेरिकामध्ये दडलेला. मेसोमेरिका म्हणजे आताचा  अल सल्वादार, ग्वाटेमाला, मध्य ते दक्षिण मेक्सिको आणि उत्तर कोस्टा रिकाचा भाग म्हणजे ख्रिस्तपूर्व काळातला मेसोमेरिका.

हजारो वर्षांपूर्वी या भागात विविध वंशाचे लोक राहायचे. मायान, ॲंझटेक हे देखील त्यातलेच. ॲंझटेक या वंशाच्या लोकांनी मायनकडून कोका बीन्स मिळवल्या. कोकाबीन्स म्हणजे ज्यापासून चाॅकलेट्स बनवले जातात त्या बिया. पण त्याकाळी कोकाबीन्स म्हणजे विद्येची/बुध्दीची दैवत मानले जात. ॲंझटेक वंशाच्या लोकांनी कोकाबीन्सपासून चाॅकलेटचं पेय बनवलं. आता आपल्या काळातलं हाॅट चाॅकलेट नव्हे. ते गोड नव्हते. कडू होतं. फेसाळ स्वरुपाच्या या पेयात मक्याचा घट्ट रस्सा आणि विविध मसाले असायचे. हे पेय प्यायल्याने पिणारा ताकदवान होतो असं ॲंझटेक वंशाचे लोक मानायचे.

मेसोमेरिकावर ॲंझटेक वंशाच्या लोकांची सत्ता होती. त्यांना कोकाबीन्सचा फारच मोह. पण ॲंझटेकच्या भागात मात्र ते पिकायचे नाही. जेथील मातीत आर्द्रता असते, ओलावा असतो अशा माती कोका बीन्स येतात.मायान वंशाचे लोक जेथे राहायचे तिथे कोका बीन्स भरपूर पिकत. त्यामुळे ॲंझटेक वंशाच्या लोक बळाच्या सहाय्याने मायान लोकांकडून कोका बीन्स मिळवू लागले. उत्पादन कमी त्यामुळे कोका बीन्स वापरण्यावर फक्त अमीर, उमराव, आणि लढवय्यांचाच हक्क होता. सामान्य माणसांनी कोका बीन्स वापरायचे नाही असा नियम ॲंझटेक सत्ताधिशांनी केला.

ॲंझटेक यांना कोका बीन्स पिकवणारे संपूर्ण क्षेत्रच आपल्या अधिपत्याखाली हवे होते. त्यांनी तसे केलेही आणि तेथील लोकांना सत्ताधाऱ्यांना कर म्हणून कोका बीन्स द्यायला लागायचे. या कोका बीन्सचा उपयोग चलनासारखा व्हायचा. कपडे, धान्य आणि इतर सेवा मिळवण्यासाठी कोका बीन्सचा चलन म्हणून उपयोग केला जायचा.

 Image: .freepik

हेही वाचा!

स्पॅनिश वंशाच्या लोकांनी हा भाग जिंकला तेव्हाही या भागातलं चलन कोकाबीन्सचं होते. स्पॅनिश सत्ताधाऱ्यंनी कोका बीन्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यांनी कोका बीन्सच्या निर्मितीवर , व्यापारावर स्वत:चे नियंत्रण आणले. पण स्पॅनिश सत्ताधाऱ्यांना कोका बीन्सची कडू चव काही आवडत नव्हती. त्यांनी त्यात गोडवा आणला. स्पेनमधे आजही सत्ता, संपत्ती आणि श्रीमंतीचं प्रतीक म्हणून चाॅकलेटला मान आहे.

तंत्रज्ञानाचा विकास झाल आणि कोका बीन्सची लागवड मोठ्या प्रमाणात होवू लागली. त्यामुळे उत्पादन वाढलं. १७ व्या शतकापासून चाॅकलेटचे विविध प्रकार आले. १८ व्या आणि १९ व्या शतकापासून ते सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला लागले. स्पेन, युरोपातलं कोका बीन्सचं उत्पादन वाढलं आणि सामान्य माणसांनाही चाॅकलेट खाता येवू लागलं. त्यानंतर मात्र चाॅकलेटचं चलन बंद झालं.

चाॅकलेटच्या चलनाचा अभ्यास काय सांगतो?

Image:.almondbuttermachine

'इकाॅनाॅमिक ॲन्थ्रोपाॅलिजीमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. हा अभ्यास सांगतो की मायान वंशाच्या काळात चाॅकलेटचा उपयोग चलन म्हणून केला जाय्चा. विकासाच्या खूप आधी मायान्स वंशाचे लोक नाण्याचा उपयोग चलन म्हणून करत नसे. तर चलन म्हणून तेव्हा बार्टर पध्दत म्हणजे वस्तूंची देवाण घेवाण करण्याची पध्दत अस्तित्त्वात होती. तंबाखू, कपडे , मका घेण्यासाठी मायान लोकं कोका बीन्स या चलनाचा उपयोग करायचे.

मायान काळातल्या कलाकृतींचा अभ्यास केला गेला. तेथील भित्तीचित्रांमध्ये, मूर्त्यांमध्ये लोकं कोका बीन्सच्या पेयाचं भांडं समोरच्याला देवून याबदल्यात वस्तू घेत असल्याचं दिसून आलं. अशा शेकडो कलाकृतींचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासक मायान काळात चाॅकलेटचं चलन असल्याच्या निष्कर्षावर आलेत. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact