
Image:evofitness.ch
मला ससा फार आवडतो. कसा मस्त पांढराशुभ्र आणि गुबगुबीत! अर्थात ससे काही फक्त पांढऱ्या रंगाचेच असतात, असं नाही, पण आपण बऱ्याचदा पाहतो, तो ससा पांढऱ्या रंगाचाच असतो.
सशांना चालताना तुम्ही कधी पाहिलं आहे?- त्याचं चालणं म्हणजे उड्या मारणंच असतं. ससा म्हणजे मुलुखाचा भित्रा. लहानपणी तुम्ही सशाची ती गोष्ट ऐकलीच असेल. पण सशाच्या खऱ्या गोष्टीही ऐकायला तुम्हाला फार आवडेल.
तुम्हाला माहीत आहे, ससा एवढा चपळ का आहे? आणि अगदी बारीकशीही चाहूल त्याला कशी काय लागते?
कारण सशाला जवळपास चारही बाजूंचं दिसतं. त्यामुळे त्याला पकडणंही फार अवघड असतं. एकाचवेळी सगळीकडचं त्याला दिसत असलं तरी अगदी नाकासमोरचं मात्र त्याला दिसत नाही. सशाचे कान आणि नाकही अगदी तीक्ष्ण असतात. वासावरुनही अनेक गोष्टी तो सहज ओळखतो.
ससा भित्री भागूबाई असला, तरी तो पळतो मात्र दणक्यात. त्याच्या या पायांमुळेच त्याला आपल्या शत्रूपासून संरक्षण करणं शक्य होतं.
सशाच्या रंगरुपाकडे जाऊ नका, त्याच्यासारख्या उड्या मारून पाहा, नाही नानी आठवली तर माझं नाव दुसरं! आज आपण हाच व्यायाम करू. याला म्हणायचं ‘बनी हॉप्स’ म्हणजे सशाच्या उड्या.
हेही वाचा!
सशासारख्या उड्या कशा माराल?
१. गुडघ्यात वाकून उभे राहा. फार जास्तही नाही आणि फार कमीही नाही.
२. पाठ ताठ ठेवा.
३. दोन्ही हात कोपरात वाकवून ससा उभा राहतो तसं उभे राहा.
४. याच स्थितीत आता मारा उड्या.
५. हा व्यायाम आणखी चॅलेंजिंग करायचा असेल, तर जास्त लांब उडी मारा.
६. आपल्याला जमेल तेवढ्याच उड्या मारा, पण सुरुवातीला जास्त बिलकूल नको

Image: .freepik
बनी हाॅप्सचा फायदा काय?
१. पायांची, मांड्यांची ताकद वाढवण्यासाठी हा टेरिफिक व्यायाम आहे.
२. लोअर बॉडीसाठीही हा एकदम हटके व्यायाम आहे.
३. तुमच्या शरीराची मोबिलीटीही त्यामुळे वाढेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact