टेक्नाॅलाॅजी वापरुन कचरा कमी करता येऊ शकतो. तो कसा?

- शिवान दर्डा

Image: consciouscharcha.

तुम्हाला हे माहिती आहे का, की आत्ता जगभरात महानगरपालिकांमध्ये किती घन कचरा गोळा होतो? तब्बल २.०१ बिलियन टन. पण त्याहून जास्त काळजीची बाब ही आहे, २०५० सालापर्यंत हा कचरा आत्ताच्या चौपट होईल असा अंदाज आहे. तुमच्या जुन्या झालेल्या टीशर्टपासून ते  वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नाकारल्या गेलेल्या मालापर्यंत आपला कचरा भीतीदायक प्रमाणात वाढतो आहे. आणि त्याचा पर्यावरणावर फार गंभीर परिणाम होतो आहे. या घनकचऱ्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन करण्यासारख्या या काही उपाययोजना आहेत. 

 

 

हेही वाचा!

एवढं ऊन पडतं आपल्याकडे, आपण काय करतो त्याचं? जरा डोक्याला शाॅट द्या ना!

१. व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिऍलिटी

image : Awavena

एखादा अनुभव प्रत्यक्ष घेण्यापेक्षा ऑनलाईन घेतला तर व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिऍलिटीच्या तंत्रज्ञानामुळे कचरा कमी व्हायला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मीटिंगसाठी प्रत्यक्ष जाण्यापेक्षा व्हर्च्युअल रिऍलिटी सेट वापरले तर कॉर्पोरेट कामासाठीचा प्रवास आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा यात बचत होऊ शकते.

टिप : तुम्हाला हे माहिती आहे का, की टेक्स्ट मेसेज करण्यापेक्षा फोटो किंवा व्हिडीओ फॉरवर्ड करायला जास्त ऊर्जा लागते? आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते.

२. वस्तूंचा सामायिक वापर

image : youloveit

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संसाधनं वाटून घेऊन कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ, एकाच गाडीतून जास्त लोकांनी प्रवास केला तर त्या प्रत्येकाच्या गाडीमुळे तयार होणारा कचरा कमी होऊ शकतो. त्यात ती गाडी बनवतांना निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून रोजच्या इंधनापर्यंत बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे इतर हत्यारं आणि घरगुती उपकरणंसुद्धा सामायिक घेता येऊ शकतात.

टिप : तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचा गट बनवून सगळ्यांना लागणाऱ्या स्टेशनरीसारख्या वस्तू आणि खेळण्यांची एकत्रित बँक करू शकता. त्यामुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या वस्तू विकत घेण्याची गरज पडणार नाही. 

३. टिकाऊ फॅशन

image : so city

पर्यावरणाच्या दृष्टीने फॅशन टिकाऊ होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. त्यात पुनर्वापर केलेला कच्चा माल वापरण्यापासून कपडा बनवण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो. त्यासाठी प्रत्यक्ष सॅम्पल पाठ्वण्यापेक्षा ते ऑनलाईन दाखवणं आणि त्याची थ्री डी मॉडेल्स बनवणं हे करता येऊ शकतं.

टिप : शक्य असेल तिथे स्थानिक जास्त काळ टिकणाऱ्या फॅशनचे कपडे विकत घ्या. तिथे तुम्हाला नक्की काहीतरी वेगळ्या वस्तू सापडतील.

 

 

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५५०० 
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact