एवढं ऊन पडतं आपल्याकडे, आपण काय करतो त्याचं?

- प्राची पाठक

 Image: freepik

'आजकाल ऊन किती वाढलं आहे' , किंवा 'आजकाल वर्षभरात केंव्हाही पाऊस पडत असतो',

अशी जी वाक्यं अधूनमधून आपण ऐकतो/बोलतो, त्यांचा वातावरणीय बदलांशी काही संबंध असेल का?

गेल्या काही वर्षांची आकडेवारी तपासून, इतर अभ्यास पाहून तज्ज्ञ नक्कीच यावर काही भाष्य करत असतात. चर्चा होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत 'चला, आता फिरायला जाऊ' , म्हटल्यावर, 'ऊन पाहिलं का किती आहे', हा पहिला डायलॉग असतो. उन्हापासून काय खबरदारी घ्यावी, याचे फॉरवर्ड्स सारखे येत असतात मोबाइलवर. सगळीकडे पर्यावरण ऱ्हास, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, वगैरे मोठाले शब्द कानी पडतात. शाळेत-कॉलेजला 'इव्हीएस' हा विषय काहीतरी कॉपी पेस्ट प्रोजेक्ट करण्यापुरता नसतो. पाणी वाचवा, जंगल वाचावा, वाघ वाचावा, वीज वाचावा, कचऱ्याचे वर्गीकरण करा, झाडं लावा, वगैरे विषयांवर निबंध स्पर्धा घेऊन, चित्रं काढून, सार्वजनिक भिंती रंगवून, घोषवाक्यं लिहून, कॉपीपेस्ट प्रोजेक्ट करून निसर्ग वाचणार आहे का? की दरवर्षी स्पर्धा तीच, विषय तेच, विद्यार्थी वेगळे, असंच होणार आहे? म्हणूनच किमान आपल्या स्तरावर काही वेगळं, थोडं सखोल आपण काही करून बघू शकतो का? निबंध, चित्रं, घोषवाक्यं लिहिणं आपल्याला त्या- त्या विषयांची माहिती देऊ शकते, जाण वाढवू शकते, गोडीही लावू शकते. परंतु, या सर्व गोष्टींना कृतीची जोड असेल, तर पर्यावरण संवर्धनात आपलाही खारीचा वाटा उचलला जाईल.

हेही वाचा!

उन्हाचंच उदाहरण घेऊ. उन्हाळ्यात जी वाळवणं केली जातात, ती कशाकशाची, कशी करतात? त्यांची 'स्टोरेज मेथड' काय असते? तिचा पर्यावरणाशी काय संबंध आहे? वेगवेगळी पेयं, सरबतं उन्हाळ्यात घ्या असं सांगतात. कुठून येतात ही सरबतं? त्यांचा पर्यावरणाशी काय संबंध आहे? इतकं सारं फुकटचं ऊन सगळीकडे पडलेलं असतं. त्यावर काय स्वरूपाची वीज निर्मिती होऊ शकते? बहिवक्र भिंगाचे प्रयोग विज्ञानात शिकवतात. असं भिंग जर एखादा कागदाचा तुकडा जाळू शकतं, तर असेच काही आरसे, भिंग वापरून त्यावर अन्न शिजू शकेल का? आपण जे अन्न खातो, ते एक प्रकारे सूर्याची ऊर्जाच खात असतो, यावर कधी विचार केलाय का? काही झाडांची पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते. काही झाडं भर उन्हाळ्यात पानगळीने बोडकी झालेली असतात. काहींना ऐन उन्हाळ्यातच नवीन पालवी देखील फुटलेली दिसते. कोणती झाडं असतील ही? पानगळीचा काय फायदा असेल या झाडांना? अनायसे पानं गळालीच आहेत, तर अशा बोडक्या फांद्यांवर बसणारे पक्षी नेमके हुडकता येतील का? उन्हाळ्यातच किती रंगांची फुलं मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेने दिसतात. ती कधी जाणून घेतली आहेत का?

Image: freepik

आता जो ऋतू आहे, त्यापासूनच विविध लहान मोठे प्रयोग, डोक्याला शॉट देतील असे निसर्ग विचार करून तर पाहू. पर्यावरण शोधयला कुठेच जायची गरज नाही. ते आपल्या आसपासच असतं. आपल्या घरात असतं. फक्त दिमाग खुला होना चाहिये...

prachi333@hotmail.com

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact