सई आणि उंदीर – भाग ८

सई आणि उंदीर आता चर्चा करायची सोडून भांडणाच्या मोडवर गेले होते. उंदीर म्हणत होता की त्याने दात घासायला सईच्या वस्तू फाडल्या, पण त्याला सईने ब्रश आणि पेस्ट देऊ केला त्याला मात्र तो नाही म्हणाला होता. मग सई पण वैतागली.

“मग कसे दात घासावे लागतात? सांग ना… का तू मला शेंड्या लावतोयस? तू ऍक्च्युअली पुस्तकं आणि बूट खातोस का? आणि ते मला सांगत नाहीयेस का?”

“अगं नाही गं!” उंदीर वैतागून म्हणाला.

“मग काय? का ज्या वस्तू तू खात नाहीस त्या खाऊन माझं नुकसान का करतोस?” सई पण चिडून ओरडली.

उंदराने पुढचे दोन पाय तिला थांबायची खूण करत समोर धरले, मागच्या दोन पायांवर बसला, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला,

“सांगतो…”

“हं??” सई हाताची घडी घालून वाट बघत उभी राहिली.

“उंदरांचे दात माणसासारखे नसतात.” उंदराने सुरुवात केली. “तुमचे दात कसे, एकदा पूर्ण वाढले की वाढायचे थांबतात.”

“म्हणजे?”

“म्हणजे आता तुझे दात आहेत, ते दुधाचे दात पडून पक्के दात आलेत. ते एकदा पूर्ण वाढले की अजून वाढत नाहीत.”

“हो मग?”

“आमचे दात तसे नसतात.”

“मग कसे असतात?”

“आमचे दात वाढायचे थांबतच नाहीत.”

“मग?”

“आमचे दात वाढतच राहतात आणि ते जर वेळच्या वेळी कशावर तरी घासले नाहीत, तर ते इतके मोठे होतात की खालचे दात वरच्या जबड्याला टेकतात आणि वरचे दात खालच्या जबड्याला टेकतात. तसं झालं तर आम्हाला तोंड उघडता येत नाही, काही खाता येत नाही. आणि मग असा उंदीर मारून जातो.

“बापरे!” हे फारच डेंजर होतं. “मग तुम्ही काय करता?”

“काय करणार?” उंदीर खिन्नपणे म्हणाला, “मग आम्ही ज्या वस्तू दिसतील त्या कुरतडतो. मग आमच्या दातांची झीज होते.”

“ओह!” सईला यावर काय बोलावं ते कळेना.

“पण ते काही सोपं नसतं. फार रिस्क असते त्याच्यात.”

“कसली रिस्क?” सईला आता उंदराबद्दल जरा सहानुभूती वाटायला लागली होती.

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact