PREVIOUSNEXT
सईने पटकन हातातला टॉर्च पेटवला आणि टेबलावरच्या खुडखूड आवाजावर प्रकाशाचा झोत टाकला आणि ती सॉलिड दचकली. तिच्या टेबलवर एक भलामोठा उंदीर बसला होता आणि चवीने तिचं पुस्तक कुरतडत होता. सई तो उंदीर बघून इतक्या जोरात दचकली, की ती जोरात किंचाळली आणि आईबाबा धावत आले.
“काय झालं?”
“का किंचाळलीस?”
“स्वप्न पडलं का?”
“टॉर्च का लावला आहेस? लाईट गेलेत का?”
असे अनेक प्रश्न विचारत आईबाबाने दिवा चालू केला. एवढ्या वेळात अर्थातच उंदीर पळून गेला होता. खोलीतली ट्यूब लावल्यावर आणि उंदीर पळून गेल्यावर सईच्या अंगात शौर्य संचारलं. ती पलंगावरून उठून बाहेर आली आणि आईबाबाला म्हणाली,

“उंदीर!”
“काय उंदीर?” बाबा म्हणाला.
“अगं सई… जागी हो. झोपेत बोलतीयेस का?”
“नाही ग!” सई आईवर फिस्कारली, “मी झोपलेच नाही. मला बघायचं होतं की माझा फ्रॉक आणि पुस्तकं कोणी कुरतडली? म्हणून मी गपचूप जागी होते. तर मला तो उंदीर दिसला.”
“अच्छा…!” आई म्हणाली, “केवढ्यांदा किंचाळलीस अगं. मला वाटलं काय चोरबीर आला की काय?”
“उंदीर येणं काही कमी सिरीयस नाहीये, समजलं ना? त्याने ‘माझा’ फ्रॉक आणि पुस्तकं कुरतडली म्हणून तुला त्याचं काही वाटत नाहीये. उद्या तुझ्या एखाद्या ड्रेसला त्याने भोक पडलं म्हणजे कळेल तुला.”
“सई…” आईने काही बोलायच्या आधी बाबाच वैतागला, “ही काय वेळ आहे का भांडायची?”
“मी नाही भांडत. पण आई कसं म्हणाली बघ ना! तिचा ड्रेस कुरतडला असता तर तिनी पण असंच केलं असतं!”
“बरं बाई… केलं असतं. आता झोप मुकाट्याने.” आई सईच्या खोलीची खिडकी लाऊन घेत म्हणाली. “आता खिडकी उघडू नकोस म्हणजे आज उंदीर परत येणार नाही.”
“पण…” सईला अजून काहीतरी म्हणायचं होतं, पण बाबा म्हणाला,
“सई आत्ता झोप. खूप उशीर झालाय. उद्या सगळ्यांना लौकर उठायचंय. तुला शाळा आहे, आम्हाला ऑफिस आहे. उद्या मी येतांना उंदराच्या गोळ्या घेऊन येतो. त्या सगळीकडे टाकून ठेऊ. म्हणजे २ दिवसात उंदीर मरेल.” असं म्हणून आईबाबा झोपायला जायला वळले. सईला काही ती आयडिया आवडली नाही. ती स्वतःशी पुटपुटली,
“असं कसं? त्या उंदराला जिवंत पकडलं पाहिजे. नाहीतर तो असं का करतो ते आपल्याला कसं कळेल?”

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact