
इंग्रजी शिकण्याचा इतका आग्रह का? मी कम्पलसरी इंग्रजी शिकायलाच हवं का? धर्मरक्षक
- समृध्दी पोरे, नागपूर
-शालेय शिक्षण आणि पुढे बारावीपर्यंत इंग्रजी हा विषय अभ्यासक्रमात कम्पलसरी विषय म्हणून असतो. पण त्यापुढचं शिक्षण घेताना इंग्रजी विषय घ्यायचा की नाही हे तुझ्या आवडीवर, तुला भविष्यात काय करायचं आहे यावर अवलंबून असेल.
- इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. आपल्या देशात आणि जगात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. प्रत्येकालाच सर्व भाषा बोलता येणं शक्य नाही. तेव्हा इंग्रजी भाषा हे एक सगळ्यांशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा येणं ही गरज आहे. या भाषेचा पाया शालेय शिक्षणात पक्का होत असतो. त्यामुळे या टप्प्यावर तू इंग्रजी शिकणं हे कम्पलसरी आहे.
- तुझ्या फायद्यासाठी तुला इंग्रजी येणं गरजेचं आहे. जगात कुठेही गेलं आणि इंग्रजी भाषा येत असली की संवादाच्या पातळीवर तुला कोणतीच समस्या जाणवणार नाही.
- समजा पुढे जाऊन तुला परदेशात शिकायला जायचं असेल, काही आंतराष्ट्रीय अभ्यासक्रमात तुला प्रवेश घ्यायचा असेल तर इंग्रजी शिकणं हे गरजेचं आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम हे इंग्रजीतच असतात. त्यामुळे इंग्रजी शिकण्याला पर्याय नाही.
- इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणात माहिती आणि ज्ञान आणि मनोरंजनही उपलब्ध आहे. इंग्रजी शिकून ते तू प्राप्त करु शकतो.
- तुझ्या वैयक्तिक वाढीसाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी इंग्रजी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे. जगातलं साहित्य, कला समजून घेण्यासाठीही इंग्रजी शिकल्याचा खूप फायदा होतो. तसेच इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात वाड:मयीन साहित्य, चित्रपट आणि कलेने समृध्द आहे. आपण जेव्हा इंग्रजी भाषा शिकतो. तेव्हा आपल्याला इंग्रजी भाषेतल्या या खजिन्यापर्यंत सहज पोहोचता येतं . आपल्या आजूबाजूचं जग समजून घेण्यालाही इंग्रही भाषा आपल्याला मदत करते. ही भाषा शिकायची ती या कारणांसाठी.
- इंग्रजी भाषा उत्तम आली तर त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. ही भाषा शिकल्याने आपला आत्मविश्वास वाढतो.
- बहुराष्ट्रीय ( मल्टिनॅशनल) कंपन्यात नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजी उत्तम असण्याची अट घातलेली असते.
- कम्युटर, तंत्रज्ञान यातलं ज्ञान इंग्रजीमध्ये आहे. ते शिकायचं तर तुला इंग्रजी भाषा शिकणंही गरजेचं आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


