- शिल्पा दातार

Image: .freepik
वर्गात शिक्षिका यायच्या असतात. मुलांचा दंगा सुरू असतो. मुलं गप्पा मारत असतात. तुफान राडा सुरू असतो. तेवढ्यात एक मुलगी विचारते,‘सलोनी, तू फेअरनेस क्रीम लावत नाहीस का?’
वर्गातल्या मुली तिला चिडवतात. कारण सलोनीचा रंग काळा सावळा असतो. त्यामुळं सलोनीशी कुणीही मैत्री करत नाही. मुली तिला खेळायला घेत नसतात. तुमच्या वर्गातही असं काही घडतं का?
ही मुलं तुमच्याएवढीच आहेत. रंगामुळं आणि इतरांनी चिडवल्यामुळं सलोनीचाही आत्मविश्वास निघून गेलेला असतो. बिचारी मुलांचं ऐकत खाली मान घालून उभी असते. पण मुलं तेवढ्यावरच थांबत नाहीत.
तेवढ्यात एक मुलगा म्हणतो, ‘लावतच नसेल फेअरनेस क्रीम. म्हणूनच ती इतकी काळी आहे.’
सलोनीला खूप वाईट वाटतं. ती अगदी रडवेली होते.
‘आईला सांग, फेअरनेस क्रीम आणून द्यायला, तिनं नाही दिलं तर मला सांग, मी आणून देईन.’
दुसरी एक मुलगी तिला त्रास देण्याच्या उद्देशाने म्हणते. सगळे सलोनीला हसतात.
हेही वाचा!
खरंतर गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व मिळालंय. काळ्या सावळ्या रंगाच्या लोकांना चिडवणं, त्यांची रंगावरून किंमत करणं हे आपल्या आजूबाजूलाही घडत असलेलं आपण बरेचदा बघतो.
मुलं सलोनीला त्रास देत असतात,आपला रंग काळा किंवा सावळा असता आणि आपल्याला कुणी रंगावरून चिडवलं असतं तर आपल्याला कसं वाटलं असतं, हा विचारही ही मुलं करत नाहीत.
मुलांची ही चिडवा-चिडवी सुरु असतानाच त्यांच्या वर्गात शिक्षिका येतात. त्या वर्गाच्या बाहेरच शांतपणे थांबून हे सगळं बघत असतात. वर्गात आल्यावर त्या मुलांना रागवत नाहीत; पण मुलांना त्यांची चूक दाखवून द्यायची, त्यांना धडा शिकवायचा, असं त्यांनी मनोमन पक्कं ठरवलेलं असतं. त्या मुलांना एका खेळातून प्रत्येक रंग कसा महत्त्वाचा असतो, हे दाखवून देतात. तसंच प्रत्येक रंगाच्या त्वचेच्या आत एकाच रंगाचं रक्त असतं, हेही सांगतात. त्या शिक्षिका हे त्यासाठी कोणता खेळ मुलांना खेळायला लावतात, हे आपणही बघायचं का? मुलांना ते पटतं का, सलोनीशी मुलं चांगलं वागतात का, हे पाहण्यासाठी आपण सलोनीच्या वर्गाची एक सैर करून येऊया.

सलोनीच्या शिक्षिका किती प्रेमळ आणि मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्या असतात, हे पाहून आपल्यालाही अशाच शिक्षिका हव्यात असं वाटतं. जास्त काही न सांगता या शिक्षिका मुलांना कृतीतून त्यांची चूक दाखवून देतात. आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या पलीकडेही शिकण्यासारखं बरंच काही असतं, हे दाखवतात. काळा रंगही महत्त्वाचा असतो, हे शिकवतात.
ब्लॅक अँड व्हाईट
पॉकेट फिल्म्स
हा लघुपट पाहण्यासाठी खालील यूआरएलवर क्लिक करा.
FB - https://www.facebook.com/PocketFilmsIn
G+ - https://plus.google.com/+PocketFilms
Twitter - http://twitter.com/pocketfilmsin
किंवा हा लघुपट तुम्ही युट्युबवरही पाहू शकता.
shilpapankaj@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact